संख ग्रामपंचायत कडून अबेंडकरनगर मध्ये स्वच्छता मोहीम

0
27

राजेभक्षर जमादार,संख (ता.जत ),दि.25ः-येथील अबेंडकर नगर वार्ड नं.३ येथे स्वच्छता करण्यात आली.काटेरी झुडपे ,व सांडपाण्याचे प्रवाह अडून डबके बनल्याने डांस , व सरपटणारे प्राण्याचा धोका निर्माण झाला होता. येथील नागरीकांनी ग्रामपंचायतीकडे येथील स्वच्छता करण्याची मागणी केली. त्यानुसार सरपंच सौ.मंगलताई पाटील यांनी पुढाकार घेऊन या भागातील काटेरी झुडपे ,कचरा अतिक्रमणे काढून परिसर स्वच्छ केले.याशिवाय विविध विकास कामे करून आश्वासनाची पुर्तता करू असे यावेळी पाटील यांनी सांगितले .एकदरीत संख मधील कामे सुरू आहेत. ग्रा.प. सदस्य वार्ड नं. ३ चे अमर कांबळे ,अनारकली मुल्ला , ज्ञानेश्वर कोळी , ग्रामसेंवक नरळे , व हनमंत कांबळे ,नंदकुमार कांबळे , यांच्या उपस्थितीत केले . व हे मोहिम राबवण्यात यश आले.