देऊळगाव/आरमोरीत नंदागवळी यांचा सत्कार

0
17

काँन्व्हेंट वार्षिकोत्सव:विदर्भ स्तरिय कविसंमेलन

नवेगावबांध(गोंदिया)दि.27 : नजिक असलेल्या येरंडी/बाराभाटीचे मुन्नाभाई नंदागवळी यांचा देऊळगाव/आरमोरीमध्ये सत्कार करण्यात आला.दरवर्षी प्रमाणे सारिपुत्त लिटल फ्लोवर काँन्व्हेटचे वार्षिकोत्सव कार्यक्रम होते. आणि दिवसा विदर्भ स्तराचे निमंत्रित कविसंमेलन आयोजन केले होते.यावेळी मंचावर वडसाचे डाँ. चंद्रशेखर बांबोळे यांच्या अध्यक्षतेखाली इंजी. विजय मेश्राम गडचिरोली यांनी उद्घाटन. केले. विशेष अतिथि म्हणून हर्षल मेश्राम भंडारा, राम महाजन, नाटककार राजू बोलकर, लेखक भिमानंद मेश्राम, नुरजहा पठाण, प्रा. मेश्राम गडचिरोली, आयोजक नागसेन गोडसे व मुख्यध्यापिका शेंडे, कुळसूंगे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

पूर्वविदर्भातील साहित्य क्षेत्रात मुन्नाभाई नंदागवळी एक उत्तम साहित्यिक,कवि, लेखक, व समिक्षक अशा भूमिका पार पाडतात याची दखल घेवूनच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नंदागवळी यांना सन्मानचिन्ह, सत्कार मानपत्र, पुस्प गुच्छ देवून सन्मान करण्यात आला. सत्काराबद्दल अनेकांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.