वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घ्या : आमदार चरण वाघमारे

0
11
मोहाडी,दि.27ः- तालुक्यातील ताडगाव येथे महावितरण जांबच्या वतीने ताडगाव येथे सौभाग्य योजनेअंतर्गत ४० वीज कनेक्शन ग्राहकाचे घरी जाऊन आमदार चरण वाघमारे यांच्या उपस्थित लाभार्थ्यांना वीज जोडणी करून देण्यात आली. यावेळी सहा अभियंता मेंढे, सरपंच सुमन बघेले, ग्रामसेवक पी आर गिरी, सामाजिक कार्यकर्ता रमेश हलमारे, इजि. डहाळे इजि माजी सरपंच बिरज वणवे, केवळ कांबळे, रमेश धांडे,  बूथ अध्यक्ष संभा धांडे,भोलाराम पारधी व इतर उपस्थित होते.
यावेळी आमदार चरण वाघमारे लाभार्थ्यांना याप्रसंगी मार्गदर्शन करत होते की, प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर प्रकाशाने लखलखीत करणे हे पंतप्रधान मोदी यांचे ध्येय म्हणेज सौभाग्य योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१७ रोजी शहरी व ग्रामीण भागातील ४ कोटी वंचित घरांना विदयुत मिळावी या हेतूने सौभाग्य योजना ( पंतप्रधान सहज बिजली हर घर योजना ) या योजनेची घोषना करण्यात आली.या योजने अंतर्गत प्रत्येक गाव प्रत्येक शहर प्रत्येक घरापर्यंत गरीब कुटूंबाना या योजनेचा लाभ मिळावा असे २०१९ लक्ष्य ठेवले आहे. या योजने अंतर्गत २०११ च्या सामाजिक आर्थिक व जाती जनगणने मध्ये अंतर्भूत गरीब कुटुंबांना वीज कनेक्शन मोफत देण्यात येणार आहे. 
या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महावितरण व सरकार सज्ज आहे. ताडगाव येथील ४० घरांचे ‘सौभाग्य’ उजळले वीजपुरवठा नसलेल्या  जास्तीत जास्त लाभार्थींनी सहभागी होऊन, सौभाग्य योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हानआमदार चरण वाघमारे यांनी केले आहे.