भाजप सदैव आपल्या पाठीशी – विनोद अग्रवाल

0
15

गोंदिया,दि.27ः- काँग्रेसकडून सदैव होणारी फसवणूक आणि पोकळ आश्‍वासने गेल्या ६0 वर्षांपासून देश बघत आला आहे. गेली ६0 वर्षे काँग्रेसप्रणित सरकारांनी सामान्यांचे हाल केले. २0१४ ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे स्वीकारली सोबतच सहा महिन्यांनी राज्यात भाजप सरकार आले आणि एक नवा आशेचा किरण देशवासीयांनी बघितला. डिजिटल इंडियाच्या मार्फत शैक्षणिक लागणारी कागदपत्र असो किंवा शेतीसाठी लागणारा ७ / १२ प्रत्येक गोष्ट ओनलाईन करून शासकीय सेवांचा लाभ सुलभ भाजप सरकारने केला. प्रत्येक गावात पाण्याची टाकी , प्रत्येक गावात वीज आणि होणार रस्ता अशाप्रकारे चारही बाजूने विकासकार्य होत असतांना आणखी पुढील वर्ष भारतीय जनता पक्षाच्या हातात देशाची सत्ता राहिली तर हा देश एक नवा कीर्तिमान स्थापन करेल असा विश्‍वास टाकत चिरामनटोला येथील शेकडो गावकर्‍यांनी जि . प. माजी उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे माझी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री भाऊराव उके सुद्धा उपस्थित होते. आदिवासी राणी दुर्गावती विचार मंच चिरामनटोला येथील किशोर उईके घनश्याम भलावी, गोविंद मरकाम, महेंद्र उईके , विनोद उईके , सुखदास व, लखन हरिणखेडे, अनुरागजी शुक्ला, फुलीचंदजी पारधी, जैतरामजी खोहरे , मुन्नासिंग नाईकाने यांच्या प्रमुख उपस्तिथीत अध्यक्ष युवराज भलावी उपाध्यक्ष किशोर उईके आणि मनोज टेकाम तसेच सचिव मनोज उईके आणि गोविंद मरकाम यांच्या प्रमुख उपस्तिथीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
प्रवेश करणार्‍यांमध्ये कुलवंती भलावी, मंजू भलावी, प्रमिला ऊईके, रुख्मिणी काकोडे, सुरमिला काकोडे, देवका भलावी, मिना मरकाम, अनिता काकोडे, लीला खुलसाम, कला मडावी, रमन ऊईके, रिमनबाई ऊईके, राधिका भलावी, खेलन ऊईके, यशोदा ऊईके, कला पुसाम, ललिता भलावी, बेनूबाई मडावी, सुनीता ऊईके, गिता मालगाम, जयवंता मरकाम, लीलाबाई ऊईके, ललिता मडावी, देवला टेकाम, रिमाबाई काकोडे, शशिकला काकोडे, शायकलाबाई पंधरे , अंजना काकोडे, बेनूबाई काकोडे, दिवलाबाई टेकाम यांच्यासह अनेक गावकर्‍यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
कुठलेही काम असेल तर आपला मुलगा म्हणून, भाऊ म्हणून कधी पण माझ्या कार्यालयात या मी आपल्या समस्य सोडवण्याचा पुरणे प्रयत्न करेल असा विश्‍वास देखील यावेळी विनोद अग्रवाल यांनी उपस्थिताना दिला.