गोरेगाव येथे  आरोग्य शिबिरात १८० रुग्णांची तपासणी

0
12
गोरेगाव,दि.२७:-येथील तालुका नियंत्रण फथकाच्या वतीने आरोग्य  शिबिराचे आयोजन (दि.२६ डिसेंबरला)पंचायत समितीच्या बचत  सभागृहात करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात १८० रुग्नांची तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती माधुरी टेंभरे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण सभापती होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे,जि.प.सदस्या ज्योती वालदे, रोहिणी वरखडे,ललीता चौरागडे,माजी  सभापती दिलीप चौधरी माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, प.स.सदस्य पुष्पराज जनबंधु, डॉ.रितेश वाठ ,तालुका वैद्यकीय अधिकारी विवेक येडे  उपस्थित होते.आरोग्य  शिबिरात डायबिटीज चे  ७० रुग्ण, बी.पी.७०,रक्त चाप(अनेमिया)५०,मुखरोग१०, क्षयरोग०२,कुष्ठरोग  ४० तपासणी करण्यात आली.सर्व निगेटिव्ह आढळले ,हायड्रोसिल हर्निया चे  ०२ रुग्ण मिळाले असुन पुढील औषधोपचारासाठी रेफर करून रुग्णांना दुरुस्त होईपर्यंत औषधोपचार देण्यात येणार असे डॉ. येळे यांनी सांगितले. सुत्रसंचालन एन के भालेराव व आभार प्रदर्शन आर जी मेश्राम यांनी केले