सालेकसा तालुक्यात मनसे फलकाचे अनावरण,तालुका वाहतुकसेना अध्यक्षपदी मोहोरे

0
15
सालेकसा(पराग कटरे)दि.२७:– महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्याध्यक्ष संजय नाईक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या उपस्थितीत सालेकसा येथे तालुका पदाधिकार्यांची निवड करुन मनसेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष सुरेंद्र पाल, कल्पेश कडू, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा,गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे,गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
त्मयापुर्वी गोंदिया येथील विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची स्थापना करत हेमंत लिल्हारे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांची भेट घेऊन शहरातील वाहतुक व्यवस्थेसह जिल्ह्यातील समस्यावर चर्चा करण्यात आली.
आमगाव येथे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवली, तालुकाध्यक्ष उमेश चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची स्थापना करण्यात आली. सालेकसा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या अध्यक्षपदी शालिक धनराज मोहारे यांची निवड करण्यात आली.यावेळी 15 ऑटो चालक व मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत प्रवेश घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी तालुक्यात मनसेची वाढ करून लोक हिताचे कार्य करण्याचे आवाहन केले.तसेच राज ठाकरेंचे विचार गावागावत पोचविण्यासाठी शाखा स्थापन करण्यासंबधी मार्गदर्शन केले.महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य अध्यक्ष संजय नाईक यांनी वाहतुक सेनेचे नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करीत मनसेतर्फे केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली.यावेळी तसेच थंडीपासून बचाव व्हावा या उद्देशाने काही गरजू वृद्ध नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, तालुका उपाध्यक्ष दिलीप ढेकवार, उपाध्यक्ष ध्रुवकुमार हुकरे, शहर अध्यक्ष राहुल हटवार, विद्यार्थी सेनेचे स्वप्नील बोंबार्डे, गोल्डी भाटिया, राहुल मेश्राम, भौतिक हरीनखेडे, स्वप्नील करवाडे, रोहित दमाहे, उमंग बंसोड, सतीश पटले इत्यादींनी परिश्रम घेतले.