गोरेगाव पंचायत समितीच्या उपसभापती श्रीमती बोपचेसह २२३ जणांनी केला काँग्रेस प्रवेश

0
17

गोरेगाव,दि.२७ः-गोरेगाव तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित तालुक्यातील म्हसगाव येथील काँग्रेस मेळाव्यात भारतीय जनता पक्षाचे कर्मठ कार्यकर्ते व म्हसगावचे माजी सरपंच गुड्डू(चंद्रशेखर)बोपचे यांच्या नेतृत्वात गोरेगाव पंचायत समितीच्या उपसभापती लीनाताई बोपचे,,निलकंठ बोपचे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी जिल्हा परिषद सदस्य रामकिशोर राऊत,माजी पंचायत समिती सदस्य मनीराम बोपचे,दुलीचंद चनाप,सखाराम तुमसरे,धृवराज मानकर,पुतीराम येलसरे,महेश कटरे,देवचंद चनाव व स्वरुप रहागंडाले यांच्यासह २०० च्यावर भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांनी काँग्रेसचे नेते माजी खासदार नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसमध्ये २६ डिसेंबरला आयोजित कार्यक्रमात प्रवेश केला.
या मेळाव्याचे उदघाटन अखिल भारतीय शेतकरी शेतमजूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष पुरुषोतम कटरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून प्रदेश काँग्रेसचे सचिव विनोद जैन,डॉ.योगेंद्र भगत,माजी अध्यक्ष एड.के.आर.शेंडे,माजी आमदार रामरतन बापू राऊत यांच्यासह जि.प.शिक्षण सभापती रमेश अंबुले,खरेदी विक्री सभापती डॉ.झामqसह बघेले,महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषा शहारे,नामदेवराव किरसान, पी.जी.कटरे ,सी.टी.चौधरी,एड.पी.सी.चौहान, राजेंद्रसिह राठोड,जगदिश येरोला,जि.प.सदस्य ज्योती वालदे,शसेंद्र भगत,अल्का कोठेवार,रत्नदीप दहिवले,राजेश नंदागवळी,विशाल शेंडे,जितेंद्र कटरे,अमर वराडे,मानिकभाऊ बिसेन,गुजोबा वाघाडे,जयतुरा चौहान,खिरचंद येळे,निरज धमगाये,मयुर हरिणखेडे आदी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.मेळाव्याचे संचालन तालुका काँग्रेस अध्यक्ष डेमेंद्र रहागंडाले यांनी केले तर आभार विशाल शेंडे यांनी मानले.