गडचिरोलीत निघाला कुणबी समाजाचा विराट मोर्चा

0
16

गडचिरोलीत,दि.२७ः-कुणबी समाजाला एसईबीसी प्रर्वगात सामाली करुन १६ टक्के आरक्षणाचा लाभ द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात यावे मागणीला घेऊन आज गुुरुवारला कुणबी समाजाचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.या मोच्र्यात काँग्रेस शेतकरी मजदूर आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले,आमदार परिणय फुके,सुनिल केदार,खासदार मधुकर कुकडे,महेंद्र बाम्हणवाडे आदी सहभागी झाले होते.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचल्यानंतर सभेला मान्यवरांनी मार्गदर्शन केले.पोलीसांनी चोख बंदोबस्त केला होता.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.मोर्चा प्रमुख मार्गाने मार्गस्थ होताच वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी चामोर्शी, आरमोरी, चंद्रपूर, धानोरा या चारही मार्गावरील वाहतूक पोलिसांनी रोखून धरली होती.मोर्चेकरी ‘कुणबी एकता जिंदाबाद’, ‘आजवर लढलो इतरांसाठी, एक लढा समाजासाठी’, ‘कुणबी समाजाला १६ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा देत होते. मात्र, विदर्भातील बहुसंख्य कुणबी ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असल्याने त्यांना मराठ्यांच्या १६ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शासनाने कुणबी समाजाला मराठ्यांच्या १६ टक्के आरक्षणाचा लाभ द्यावा, अशी मागणी यावेळी नाना पटोले यांनी केली.