रेतीचे अवैध ११ टिप्पर व चार ट्रॅक्टर जप्त

0
10

तुमसर, दि.२७:: रेती अवैध वाहतूक करणाऱ्या ११ टिप्परसह चार ट्रॅक्टर गुन्हे शाखेच्या पथकाने तुमरस ते भंडारा मार्गावर कारवाई करून गुरुवारी पहाटे ५ पकडले. टिप्पर चालकाजवळ मध्यप्रदेशातील वाहतूक परवाना आढळल्याने तो बनावट असण्याचा संशय पोलिसांना आहे. एलसीबीच्या या कारवाईने महसूल प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भंडारा मार्गावर पहाटे ५ वाजता धाड मारून कारवाई केली. त्यावेळी टिप्पर क्र. एमएच ४९ टी ३३०३, एमएच ३६ एफ ८७८७, एमएच ४० एके ७५५३, एमएच ३६ एफ २०५०, एमएच ३१ सीक्यू. ७१६४, एमएच ३६ एफ १८०२, एमएच ३६ जी ८७००, एमएच ३४ एबी ५४४८, एमएच ४० बीजी २३५३, एमएच ४९ एटी ३१३२ यांना रेती वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आले. तुमसर पोलीस ठाण्याच्या परिसरात जागेअभावी तुमसर बसस्थानक कार्यशाळेमागील परिसरात उभी करण्यात आली आहेत. यातील काही टिप्परमधून पाण्याची गळती सुरु होती. तुमसर तालुक्यात रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर क्र. एमएच ३६ झेड ०९३४, एमएच ३४ एल ८०२०, एम् एच ३५ जी ९१११ व एमएच ३५ जी ६७३७ यांनाही ताब्यात घेण्यात आले.
सदर धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक पोटे, सहाय्यक उपनिरिक्षक प्रितीलाल रहांगडाले, पोलीस शिपाई सुधीर मडामे, कौशीक गजभिये यांच्या पथकाने केली. सदर वाहनचालकाजवळ मध्यप्रदेशातील टीपी आढळली. टीपीची सध्या तपासणी व चौकशी सुरु आहे. भंडारा येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सदर धडक मोहीम राबविली. तुमसर येथील महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे