दुर्गेश बिसेन यांची शाळेला सहृदय मदत

0
13

गोरेगाव,दि.28ः-तालुक्यातील बाम्हणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा चैतन्य बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ बाम्हणीचे संस्थापक दुर्गेश बिसेन यांनी जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा बाम्हणी येथील वर्ग 5 वीच्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तयारीसाठी 12 पुस्तिका शाळेला भेट देत नव्या अध्यायाला सुरवात केली आहे.एक दिवस शाळेच्या व्हाट्सएपच्या समूहात चर्चा करीत असतांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत चर्चा सुरू होती. तेव्हा विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुस्तके नसल्याची अडचण असल्याचे कळल्याने त्यांनी शाळेला 1880 रुपयाच्या 12 पुस्तिका शाळेला भेट दिल्या आहेत.त्यांच्या या सहृदय भेटीसाठी त्यांचे जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा बाम्हणी येथील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यातर्फे मनपूर्वक आभार मानले.