निर्देयी मातेनेच केली दीडवर्षीय बालकाची हत्या

0
10

संख,(राजेभक्षर जमादार),दि.28ः- जत तालुक्यातंर्गत येत असलेल्या असंगी येथील संगीता भानुदास गडदे आत्महत्या प्रकरणातील सत्य पोलीसांनी समोर आणले असून संगिता हिने दुर्धर आजाराच्या नैराशातून आपल्या दीड महिन्याच्या बाळाचे पाण्यात डोके बुडवून खून करून स्वतः विहिरीत उडी घेत आत्महतेचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले.उमदी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संगीता गडदे हिचे आंसगी येथील भानुदास गडदे यांच्याशी लग्न झाले.तिला दिड वर्षाचे मुल आहे. तिला दुर्धर आजार झाल्याचे काही दिवसापुर्वी समोर आले होते.नवऱ्याला आजाराची माहिती होती. त्यामुळे ती काही दिवस कोकळे येथे सासरी राहवयास होती.24 डिसेंबरला सासरी आली असता नवरा भानुदास यांने तु इकडे कशाला आलीस,तु तुझ्या आसंगी गावातील मामा तानाजी यांच्या घरी निघून जा म्हटल्याच्या रागातून तीने 24 डिसेंबरला साडेतीन वाजेच्या सुमारास बिरोबा मंदिरासमोरील पाण्याच्या आडाजवळ पाण्याने भरलेल्या बादलीत स्वतःच्या दीड महिन्याच्या बाळाला बुडवून त्याच्या खून केला. मयत बाळ विहिरीवर ठेवून स्वतः विहीरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र विहिरीत पाणी कमी असल्याने तिचा मृत्यू झाला नाही.रात्रभर ती मोटारीच्या पाईपला धरून उभी होती.विहिरीच्या मालकास विहिरी काठावर मयत बालक दिसले.त्यांने विहिरीत डोकावले असता संगीता गडदे ही मोटारीच्या पाय धरून उभी असल्याचे आढळून आले.त्याने काही तरुणांना व सरपंच यांना माहिती दिली.विहिरीतील संगीताला पाण्याबाहेर काढण्यात आले. उपचारासाठी तिला मिरज ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तिच्या या प्रकाराबद्दल आंसगीत उलटसुलट चर्चा सुरू होती.
या संदर्भातला गुन्हा उमदी पोलिसात दाखल झाला होता, संगीता गडदे हिचा पोलिसांनी जबाब घेतला असता, नवऱ्याने दूर्धर आजार झाला आहे तू इकडे येऊ नकोस असे म्हटल्याच्या नैराशेतून आपल्या दीड महिन्याच्या बाळास बादलीत बुडवून मारून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब दिला आहे. पोलिसांनी संगीता विरोधात बालकाचा खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.