संखच्या गुरूबसव मठात ता.28 ते 2 जानेवारीपर्यत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

0
16

संख : (राजेभक्षर जमादार),दि.२८:-येथील श्री.गुरुबसव विरक्त मठ संखच्या वतीने दि.28 डिंसेबर ते 2 जानेवारीपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.श्री गुरुबसव विरक्त मठाच्या नूतन इमारतीचे वास्तुशांती व ग्रामदैवत लायव्वादेवी पालखी उत्सव,आणि 1001सुवासिनींचे ओढी भरण्याचा कार्यक्रम, श्री गुरुबसव मुर्तीची प्राणप्रतिष्ठा असे कार्यक्रम सहा दिवसात होणार आहेत.येथील गुरूबसव मठामध्ये या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.शुक्रवार दि.28 डिंसेबर ते 1 जानेवारीपर्यत सायंकाळी सात ते आठ पर्यत प्रवचन शुक्रवार दि..28,ला,श्री.मुरघेंद्र महास्वामीजीं,शनिवार 29 डिसेबंरला कोटुरेश्वर महास्वामीजी(कोडुरेश्वर मठ),रविवार दि.30 डिसेबंरला,सकाळी 10 ते संध्या 6 वाजेपर्यत मोफत नेत्र तपासणी व शस्ञक्रिया शिबीर,डॉ.प्रभूगौडा पाटील(विजापूर)यांच्याकडून सायंकाळी,सिध्दलिंग स्वामीजी(बसवन बागेवाडी),सोमवार दि.31 डिसेबंरला.विजयकुमार स्वामीजी(बिड),बुधवार दि.2 दुपारी 1 वाजता कुंभमेळा,वाद्यांच्या गजरात श्री.गुरूबसव स्वामीजीच्या मुर्ती भव्य मिरवणूक आदि कार्यक्रम होणार आहेत.
दि.28 पासून 2 जानेवारीपर्यत देगणी देणाऱ्या भक्तांचा सत्कार संयोजकांकडून केला जाणार आहे.यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.