जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व्यसनमुक्ती समित्या- राजकुमार बडोले

0
12

मुंबई, दि. 29 : राज्याचे व्यसनमुक्ती धोरण व अनुषंगिक कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व्यसनमुक्ती समित्या स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.
व्यसनमुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीच्या आढावा बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी श्री. बडोले बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे व इतर अधिकारी उपस्थित होते.
श्री. बडोले म्हणाले, व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरिय समित्या कार्यरत असून जिल्हास्तरावरही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व्यसनमुक्ती समित्या स्थापन करुन या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावयाची आहे. राज्यस्तरीय व्यसनमुक्ती नियामक मंडळाच्यावतीने जिल्हास्तरीय, ग्राम रक्षक दल, ग्रामपंचायत व्यसनमुक्ती कार्यसमित्यांचे सदस्य, कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना व व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्या इच्छुक लोकांना व्याख्याने, पथनाट्य, पोस्टर्स चित्रफीत व
इतर माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.