९ आरोपींना ७ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

0
7

तिरोडा,दि.29 : तिरोडा पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनात अवैध दारू विक्रेत्यांवर शिघ्र कृती दलाच्या साहाय्याने कारवाई करून सुमारे १० लाख रुपयांचा मोहा सडवा नष्ट करून सहा महिलांसह ९ आरोपींना अटक केली होती. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अवैध दारू विक्रेत्यांना ७ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे..

दारू विक्रेत्यांमध्ये शकुंतला कुवरदास बिंझाडे (५७), मायाबाई प्रकाश बरीयेकर (५५), मंगलेश श्रावण कनोजे (२८), भूपेंद्र माणिक बरीयेकर (४२), मायाबाई श्यामराव झाडे (३७), वनमाला भीमराव झाडे (४५), तरासनबाई अशोक बरीयेकर (५४), सुखवंताबाई बाबुराव बरीयेकर (५५), पूर्णाबाई प्रल्हाद तांडेकर (५०) सर्व रा. संत रविदास वॉर्ड, तिरोडा यांचा समावेश आहे. पोलिसांनी अवैध दारूविक्रीच्या प्रकरणात आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिरोडा पोलिसांच्या या कारवाईमुळे तिरोडा तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांसह गोंदिया जिल्ह्यातील सर्व दारू विक्रेत्यांना धडकी भरली असून जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे..