२६ वे झाडीबोली साहित्य संमेलन बोरकन्हार येथे आजपासून

0
54

गोंदिया,दि.२९ः- झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीच्यावतीने २६ वे झाडीबोली साहित्य संमेलन आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे आज शनिवार २९ व ३० डिसेंबर रोजी स्व.विजयजी शर्मा साहित्य नगरी, स्व.राधादेवी शर्मा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बोरकन्हारच्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे.या समेंलनाचे समेंलनाध्यक्ष सुप्रसिद्ध कवी, लेखक व नाटककार मिqलद रंगारी हे राहणार आहेत.तर उदघाटन तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल कुहिकर यांच्या हस्ते होणार आहे.पाहुणे म्हणून लोकसत्ताचे आवृत्ती प्रमुख देवेंद्र गावंडे,जेष्ठ कवी डॉ.चंद्रमोहन गुप्ता,ज्येष्ठ कवी व पत्रकार माणिक गेडाम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
२९ डिसेंबरला सकाळी ९ वाजता पुस्तकपोहा काढण्यात येणार आहे.या पोह्यामध्ये मुरलीधर फुंडे,विनायक करंडे व त्यांचे सहकारी भजन मंडळ सहभागी होणार आहेत. उदघाटन समारंभ डॉ.अनिल नितनवरे मांडवात दुपारी १२:०० वाजता होणार असून शाहीर लोकराम शेंडे यांचे गौरव गीत सादर करण्यात येणार आहे.साहित्य समेलनाची भूमिका डॉ.हरिश्चंद्र बोरकर मांडणार आहेत.या कार्यक्रमात आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार : अ‍ॅड.दत्तात्रेय आंधळे (आंभोरा : एक शोधङ्क),ना.रा.शेंडे लोकसाहित्य पुरस्कार : डॉ.मधुकर नंदनवार (ङ्कदंडार : एक अध्ययनङ्क),गजानन बागडे काव्य पुरस्कार:.भा.ग.पोपटे(ङ्कसिनगारङ्क),आकाशानंद आत्मकथन पुरस्कार:.के.पी.उके(ङ्कपुढचं पाऊलङ्क) यांना देण्यात येणार आहे.तसेच यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.सोबतच झाडीबोलीतील लेखकांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.त्यामध्ये पायवा:संपादक:-सुकचंद वाघमारे,उंबराची फुले,संदर्भ:डोमा कापगते,उमरी.हरिश्चंद्राची फॅक्टरी:मुलाखत: बंडोपंत बोढेकर, चंद्रपूर.मोतीरामबाबा रचनामृत,भक्तीगीत संग्रह:सुभाष धकाते,उमरी.परतफेड उपकाराची(नाटक):नरेंद्र नारनवरे,पुण्याई:आई बाबांची (नाटक):मिलिंद रंगारी,झुंज कष्टाशी(कवितासंग्रह):किरण मोरे,सालेकसा,संघर्ष (कवितासंग्रह):दिनेश अंबादे,गोरेगांव,एक अनाम पुस्तक : डॉ.ज्ञानेश्वर टेंभरे,नागपूर,पणन:कवितासंग्रह: देवेंद्र चौधरी,तिरोडा,जुन्या जिंदगीत माझ्या: कवितासंग्रह: प्रा.अश्विन खांडेकर,सालेकसा
स्पंदने:कवितासंग्रह:प्रा.इंद्रकला बोपचे-चौधरी(इंद्रा)सालेकसा,पाकळ्या:लेखसंग्रहःमहेंद्र सोनवाने, गोंदिया यांच्या पुस्तकाचे प्रकाश करण्यात येणार आहे.या उदघाटन सोहळ्याचे आभारा लखनqसह कटरे करणार असून सुत्रसंचालन अनिल शहारे व पवन पाथोडे करणार आहेत.
दुपारच्या सत्रात आजच्या ‘मीटू‘च्या माहोलात झाडीपट्टीतल्या मायची भूमिका या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून या सत्राचे अध्यक्ष लखनसिंह कटरे राहणार आहेत.चर्चेत डॉ.शाम मोहरकर चंद्रपूर,डॉ.हेमकृष्ण कापगते साकोली,अ‍ॅड.दत्तात्रेय आंधळे अंबेजोगाई,मुरलीधर करंडे आमगांव,सविता बेदरकर गोंदिया हे सहभागी होणार असून संचालन सुकचंद वाघमारे तर आभार सुशील खापर्डे करतील.तिसèया सत्रात सायकांळी ०५:३० ते ०६:३० वाजेदरम्यान स्थानिका सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.चौथ्या सत्रात रात्री ०७:०० ते ०९:०० वाजता दंडारीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तर पाचव्या सत्रात रात्री ०९:०० वाजता कविसमेलंनाचे आयोजन करण्यात आले असून या कविसमेलनाचे अध्यक्ष बंडोपंत बोढेकर राहणार आहेत.सुत्रसंचालन प्रा.अश्विन खांडेकर, श्रीमती नूरजहाँ पठाण करणार असून आभार सुशीलकुमार खापर्डे हे करतील या कवी समेलनात डॉ.राजन जयस्वाल, ना.गो.थुटे, हिरामण लांजे, डॉ.हेमकृष्ण कापगते, विठ्ठल लांजेवार, राम महाजन, शिवशंकर बावनकुळे, सुकचंद वाघमारे, इंद्रकला बोपचे, मधुकर गराटे, देवेंद्र चौधरी(तिरोडा), पवन पाथोडे, चंद्रकुमार बहेकार, देवेंद्र रहांगडाले(बोरकन्हार), सुशीलकुमार खापर्डे, प्रा.डॉ.सी.टी.राहुले, प्रा.डॉ.रवी चंद्रिकापूरे, मुन्नाभाई नंदागवळी, प्रियंका रामटेके, अंजनाबाई खुणे, प्र.ग.तल्लारवार, पांडुरंग भेलावे, वा.चं.ठाकरे, दिवाकर मोरस्कर, डोमा कापगते, नीलकंठ रणदिवे, पालिकचंद बिसने, रणदीप बिसने, डॉ.शेखराम येळेकर, शेषराव येळेकर, बाबुराव टोंगे, धनराज ओक, ग.रा.वडपल्लीवार, नरेश देशमुख, नारायण निखाते, देवीदास इंदापवार, लोकराम शेंडे, दौलत खाँ पठाण, एकनाथ बुद्धे, वसंत चन्ने, सुभाष धकाते, माधुरी रंगारी, विजय मेश्राम, डॉ.चंद्रकांत लेनगुरे, रंजना हलमारे, वासुदेव राघोर्ते, भा.ग.पोपटे, प्रवीण पाथोडे, प्रतीक्षा कापगते, किरण मोरे, रमनदास बोंबर्डे, सुरेश रहांगडाले, लोकेश नागरीकर, पुंडलिक हटवार, राहूल हटवार, मनोज शरणागत, किशोर चौधरी, महेंद्र सोनवाने आदी कवी सहभागी होणार आहेत.
३० डिसेबर रविवारला सकाळी ९वाजता विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजन जायस्वाल राहणार आहेत.ना.गो.थुटे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.सूत्रसंचालन : लखनसिंह कटरे व आभार आशिष लिलाधर कटरे हे करणार आहेत.सातवा सत्रामध्ये आमची झाडीबोलीची पुस्तक या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे राहणार आहेत तर बाबूराव टोंगे,डोमा कापगते,दिवाकर मोरस्कर,अंजनाबाई खुणे,विष्णू भेंडारकर,ना.गो.थुटे हे सहभागी होणार आहेत.संचालन लोकेश नागरीकर तर आभार रितेश शहारे हे करतील.आठवा सत्रात सकाळी ११:३० ते ०१:३० वाजता आमी नाचतून,ते हासतेत या विषयावर चर्चा होणार आहे.अध्यक्षस्थानी हिरामण लांजे राहणार असून
पांडुरंग भेलावे,संजय निंबेकर,ग.रा.वडपल्लीवार,पुना अवरासे,सुबोध कान्हेकर,डॉ.चेतन राणे हे सहभागी होणार आहेत.या सत्राचे सूत्रसंचालन देवेंद्र रहांगडाले तर आभार राजेश कटरे करतील.९ व्या सत्रात भाषिक कविसमेलन घेण्यात येणार असून लखनसिंह कटरे भूमिका मांडणार आहेत.सूत्रसंचालन डॉ.संतोष मुज़मदार (ईलाहाबाद निज़ामत) हे करतील तर साजिद खैरो, वाराशिवनी,दिनकरराव दिनकर वाराशिवनी,साहबलाल सरल, बालाघाट, भाऊराव महंत बालाघाट,संजय अश्क बालाघाट,गजेंद्र रामटेके डोंगरगढ,संतोष बरमैया रामटेक,भूपेश भ्रमर लांजी,शशि तिवारी,मनोज बोरकर गोंदिया,असीम आमगावी आमगांव,चैतन्य माथुरकर, माणिक गेडाम,युवराज गंगाराम, लक्ष्मीकांत कटरे,रूपचंद जुमहारे गोंदिया,डी.एस.टेंभुर्णे आमगांव,कु.सरिता सरोज गोंदिया व बसंत मोहारे आमगांव सहभागी होणार आहेत. सायकांळी ०३:३० ते ०५:०० वाजता समेलनांचा समारोप समेलनाध्यक्ष मिqलद रंगारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.या समारोपाला जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले विशेष अतिथी राहणार आहेत.तसेच प्राचार्य श्रीराम भुस्कुटे,राजकुमार हिवारे,उषाकिरण आत्राम,प्राचार्य व्ही.डी.मेश्राम,प्राचार्य सी.जी.पाऊलझगडे,झामसिंग येरणे उपस्थित राहणार आहेत.