महिला पोलीस पाटलाने दिली तहसिलदाराला तलवारीने मारण्याची धमकी

0
29

गोंदिया,दि.29ः- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुका हा वाळुउत्खननाच्या बाबतीत महत्वाचा तालुका असून तहसिलदार संजय रामटेके यांनी तालुक्यात येणार्या नदीघाटावरील अवैध वाळुवाहतुकीवर आळा घालण्यास सुरवात केल्याने अवैधरित्या वाळूची वाहतुक करणार्यांनी तहसिलदाराला तलवारीने जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 28 डिसेंबरला घडली.विशेष म्हणजे तहसिलदाराला जिवे मारण्याची धमकी देणार्या 4 आरोपीमध्ये बिरोली येथील पोलीस पाटील पुष्पा सोनवणे यांचा समावेश आहे.त्यांच्यासोबत चंद्रकुमार सोनवणे,शुभम सोनवणे यांचा समावेश आहे.तिरोडा पोलीसांनी यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवित तिघांनाही ताब्यात घेतले आहे.28 डिसेंबरला वाळुचे अवैधभरलेले ट्रक्टर घेऊन आरोपी पळून गेले होते.या घटनेने पुन्हा अवैधवाळूमाफियांसह चोरट्यांची दादागिरी समोर आली आहे.