प्रोग्रेसिव्ह शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

0
16

गोंदिया,दि.30ः-श्रीमती उमादेवी बहुद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूल्समध्ये चार दिवसीय वार्षिक क्रिडा व स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पालकवर्ग व संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, उपाध्यक्ष अल्का कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार, सहसचिव पद्मा कटकवार यांच्याद्वारे मां शारदा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. क्रिडा संमेलनात विविध प्रतियोगिताचे आयोजन करण्यात आले असून, यात लेझीम, डमबल्स, म्युजिक पी. टी., स्कीपिंग, मनोरे, कुरास प्रदर्शन, दौड, फुटबॉल, रिले रेस, थ्रो बॉल, संगीत कुर्सी, कंगारू रेस व स्नेहसंमेलनात लोकनृत्य, पारंपरिक नृत्य, देशभक्ती नृत्य व नाटक चिमुकल्या विद्यार्थी द्वारे सादर करण्यात आले. यावेळी संस्था सचिव निरज कटकवार यांनी उत्कृष्ठ कलाकृति सादर करणार्‍या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ओ. टी. रहांगडाले, कुमुदिनी तवाडे, वाय. आशा राव, अभय गुरव, दयावंता राऊत, भानुलता लावेटी, स्मिता शुक्ला, सिमरन बास्के, राहुल रामटेके, व सर्व शिक्षक-कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.