मग्रारोहयोच्या क र्मचारी-अधिकाèयांच्या मानधनात वाढ करा

0
26

गोंदिया,दि.३१ः- राज्यात मग्रारोहयो अधिकारी-कर्मचारी हे अत्यल्प मानधनावर राज्य व केद्र शासनाच्या योजना यशस्विरित्या राबवित असल्याने मानधनात वाढ करुन शासकिय नोकरभरतीत नियमित करण्याचे निवेदन मग्रारोहयो संघटनेच्यावतीने आमदार विजय रहागडांले यांना देण्यात आले.निवेदनात वादगस्त यंत्रणा तात्काळ रद्द करुन शासकीय विभागात कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाèयांना शासनाच्या आस्थपनेवर घेण्यात यावे.गुजरात, मध्यप्रदेश, मनीपूर, हिमाचल प्रदेश, उडीसा, त्रिपुरा, बंगाल, पंजाब, बिहार, हरीयाना, दिल्ली, छत्तीसगड, राजस्थान या सर्व राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कर्मचाèयांना आस्थपनेवर घेऊन वेतनात वाढ केली आहे.त्यानुसार महाराष्ट्र शासनाने धोरण तयार करुन तात्काळ मान्यता देण्यात यावी.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व कंत्राटी करार तत्वावर कर्मचाèयांना समान काम समान वेतन तात्काळ लागू करण्यात यावे, महाराष्ट्र सुद्धा नगर पंचायत/नगरपालिका एमआरएचएम/उमेद/सर्व शिक्षा अभियान व योजनेमध्ये कंत्राटी कर्मचारी यांना ३५००० ते ४५००० मानधन मिळत आहे. व मग्रारोहयो योजनेत काम करणाèया कर्मचारी ६००० व १४००० पर्यंत मानधन मिळत आहे. ही तफावत तात्काळ दूर करण्यात यावी. मग्रारोहयो कर्मचारी अधिकारी यांना अपघात विमा योजनेत समाविष्ट करण्यात यावे, कंत्राटी कमर्गचाèयाची तात्काळ तक्रारी आल्यास qकवा आरोप प्रत्यारोप असल्यास पूर्णत: चौकशी करुनच पुढील कार्यवाही करण्यात यावे, इतर योजनाप्रमाणे मग्रारोहयो कंत्राटी कर्मचाèयाची सुद्धा पीएफ कपात करुन लाभ देण्यात यावे आणि वैद्यकीय रजा व वैद्यकीय भरपाई शुल्क देण्याची मागणी मुख्यमंत्र्याच्या नावे दिलेल्या निवेदनात केली आहे.निवेदन देतेवेळी भाजप तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, पुष्पराज जनबंधू, खेमेंद्र टेंभरे, डी.सी. लिल्हारे, विनोद धावडे, अनिल हरिणखेडे, विजय पटले, नंदकिशोर चौधरी, अनिल हरिले, हरिश कटरे, विवेक शेंडे, निरज कटरे, नरेंद्र नागफासे, गुणेश बोपचे, हेमंत बघेले, प्रविण खरवडे, मुकेश क्षिरसागर आदी उपस्थित होते.