आ.अग्रवाल हस्ते पिपरटोला येथे ७-१२ चे वितरण

0
24

गोंदिया,दि.31 : क्षेत्रातील सामान्य नागरिक, शेतकरी व शेत मजुरांच्या समस्या सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कालव्यांची दुरुस्ती व खोलीकरण केल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचले. येथील शेतकऱ्यांना ७-१२ दुरुस्तीसाठी हजारो रुपये खर्च करून भूमिअभिलेख कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे आम्ही ७-१२ नि:शुल्क दुरुस्ती करवून दिले असून पिपरटोला हे पहिले ग्राम ठरले आहे. कारण, ‘गोष्टी कमी व काम जास्त’ हाच काँग्रेसचा मुलमंत्र असल्याचे प्रतिपादन आमदर गोपालदास अग्रवाल यांनी केले.

तालुक्यातील ग्राम पिपरटोला (गिरोला) येथे नि:शुल्क दुरुस्त करण्यात आलेल्या ७-१२ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी, हरिणखेडे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसीलदार सारंग प्रामुख्याने उपस्थित होते. ग्राम पिपरटोला येथील शेतकऱ्यांच्या ७-१२ मध्ये त्रुटी होत्या. यामुळे येथील शेतकऱ्यांना जमिनीवर कर्ज घेणे, शासनाची मदत मिळविणे, कृषी योजनांचा लाभ व जमिनीच्या खरेदी-विक्रीत अडचण येत होती. तर या ७-१२ दुरुस्तीसाठी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोठी रक्कम घेतली जात होती. यामुळेच आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यातील ५० हून अधिक गावात नि:शुल्क पुनर्मोजणी करून ७-१२ दुरुस्ती करण्याची मोहीम राबविण्यात आली. यातूनच ७-१२ दुरुस्ती करून शेतकऱ्यांना ७-१२ वाटप करण्यात आले. याप्रसंगी चमन बिसेन, प्रमिला करचाल, जयश्री रहांगडाले, लुकेश रहांगडाले, चंद्रशेखर रहांगडाले, पन्नालाल रहांगडाले, महेंद्र देशमुख, संतोष ठाकरे, प्रदीप न्यायकरे, दिनेश काटेवार, पुष्पा अंबुले, कविता तुरकर, सुशीला बागडे, सविता राऊत, प्रकाश तांडेकर, बेनू नेवारे, साधना न्यायकरे, प्रवीण वगारे, जितेंद्र ढेकवार, कीर्ती नागपुरे, ललित खजरे, अमित नागफासे, शालिकराम शहारे, दिनेश कटरे, सुरेंद्र तुरकर, सोमाजी चौधरी, लिखनदास नंदागवळी, चंदन न्यायकरे, गणेश चौधरी, निलकंठ ठाकरे, दिनेश तुरकर, यशलाल कटरे, मोरेश्वर अंबुले यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते. .