भजेपार येथे आंतरराज्य कबड्डी महासंग्राम ४ जानेवारीपासून

0
13
– प्रो-कबड्डी खेळाडू, भारतीय हॉकी संघाची माजी कर्णधार लावणार हजेरी
 – नाळ चित्रपटाचे कलावंत ठरणार आकर्षण
गोंदिया,दि.0१ः- सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचा आंतरराज्यीय महासंग्राम ४ जानेवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये रंगणार असून या स्पर्धेला भारतीय हॉकी संघाची माजी कर्णधार सबा अंजुम करीम, प्रो-कबड्डीचा स्टार खेळाडू सारंग देशमुख यांच्यासह नाळ चित्रपटाचे कलावंत अ‍ॅड.गणेश देशमुख व बुलडाणाचे समाजसेवी अशोक काकडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
भजेपार चषक म्हणून ओळखल्या जाणाèया या तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन ४ जानेवारी रोजी आ. संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली माजी खा. नाना पटोले यांच्या हस्ते होईल. यावेळी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. गावातील प्रौढ खेळाडूंच्या प्रदर्शनी सामन्यानंतर स्पर्धेला सुरवात होईल. याप्रसंगी नाळ चित्रपटाचे कलावंत अ‍ॅड. गणेश देशमुख उपस्थितांना चित्रपट निर्मिती क्षेत्राबद्दलची माहिती देतील. स्पर्धेच्या दुसèया दिवशी भारतीय हॉकी संघाची माजी कर्णधार, अर्जुन पुरस्कार प्राप्त पद्मश्री सबा अंजुम करीम उपस्थित राहणार आहे. तर पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार अशोक नेते, प्रो-कबड्डी तमिळ थलैवाचा स्टार खेळाडू सारंग देशमुख, माजी जिप अध्यक्ष विजय शिवणकर यांच्यासह अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. महिला व पुरुष गटातील प्रथम विजेत्यांना प्रत्येकी ३१ हजार रुपये, व्दितीय २१ हजार, तृतीय ११ हजार रुपये रोख पुरस्कार व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्लेअर ऑफ द डे खेळाडू हेल्मेट, बेस्ट कॅचर खेळाडूला वॉटर क्युरिफायर, मॅन ऑफ द सिरीज खेळाडूला स्पोट्र्स सायकल, बेस्ट रायडर खेळाडूला मिक्सर मशिन ठरणाèया खेळाडूंना आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. सुर्योदय क्रीडा मंडळातर्फे आयोजित या स्पर्धेच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत, नवयुवक कबड्डी क्लब, गुरुदेव सेवा मंडळ, स्वामी विवेकानंद अभ्यास कक्ष, स्थानिक शाळा व्यवस्थानाचे सहकार्य मिळत आहे.
प्रेक्षकांसाठी गॅलरीची सोय….
भजेपार चषक आंतराज्य कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाèया खेळाडूंसाठी विविध सोयीसुविधांसह प्रेक्षकांना खेळाचा आनंद घेता यावा यासाठी आयोजकांनी मैदान परिसरात बसण्याची गॅलरी तयार केली आहे. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.