आर्थिक व्यवहारात घोळ करणा-या सरपंच ला अपात्र करा अन्यथा उपोषण

0
28

गोंदिया,,दि.0१ःः थेट निवडणुकीतून निवडून आली असली तरी गावाच्या विकासाच्या बाबतीत ग्रामपंचायतीतील उपसरपंचासह इतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेणे गरजेचे असतांना इतर कुणालाही काहीही न विचारता आर्थिक व्यवहारात सर्रास घोळ करणा-या सरपंचाला अपात्र ठरविण्यात यावे अन्यथा ग्रामपंचायतीचे इतर सदस्य गावक-यांच्या सहकार्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असा इशारा दांडेगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच हिरामन बावणकर यांनी गोंदियातील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेतून दिला आहे.या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भाउदास चव्हाण, संदिप वासनिक, शोभा बावणकर, लिनताबाई उके, रिना क्षीरसागर सोबत उपस्थित होते.

दांडेगाव ग्रामपंचायत ची सरपंच बेबीनंदा विनोद चैरे यांच्यावर इतर आरोप लावतांना सदस्यांनी सांगितले की सरपंचाचे पती विनोद चैरे हे ग्रामपंचायत च्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात सोबतच वेळेप्रसंगी सरपंचाच्या कुर्सीवर बसून ग्रामपंचायतची प्रोसेडिंग,चेक बुक इतर शासकीय कागदपत्रे बघतात व ग्रामपंचायत कामात ढवळाढवळ करतात. दांडेगाव ग्रामपंचायतीतील हेटीटोला पाणी पुरवठा योजना अंतर्गत विहिरीचे खोदकाम करण्यात आले त्यात पाणी लागलेला नसतांनाही विषय मासिक सभेत न घेता कंत्राटदारासोबत संगनमत करून 21 लाखांचा धनादेश भुगतान करण्यात आला आहे. गावातील संपूर्ण गटारे साफ करण्याकरिता मजुरांना 20 हजार रूपये कुणालाही विश्वासात न घेता पगार करण्यात आले आहे. दांडेगाव ग्रामपंचायतीचे 14 व्या वित अंतर्गत आलेले 19 लाख रूपये पडून असून सुद्धा गावाच्या विकासकामांना सरपंच मंजुरी देत नाही. त्यामुळे विकासाचे काम अडकले आहेत. गावातील बुद्ध विहार येथे 95 हजार मधे शौचालय करिता पाण्याची सोय करण्यात आली त्यातील पगार 5 टक्केच्या हिशोबाने कमीशन मिळाली नसल्यामुळे अडकवून ठेवण्यात आलेला आहे. इतर सदस्यांनी गावाच्या विकासासंदर्भात बोलणी केली असता सरपंच बेबीनंदा त्यांना सर्रास म्हणतात की मी थेट निवडून आली,मला एकही ग्रामपंचायत सदस्यांची गरज नाही की करेन तोच कायदा ग्रामपंचायत अंतर्गत होणा-या कोणत्याही कामाची टक्केवारी घेतल्याशिवाय कोणतेही काम करू देणार नाही अशाप्रकारचे अरेरावी सरपंच ग्रामपंचायतीत इतर सदस्यांसह गावक-याशीही करत असल्याचा आरोप इतर सदस्यांनी लावला आहे. अश्या हिटलरशाही व्यवहार करणा-या सरपंचावर अपात्रतेचे प्रकरण गोंदियाचे अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे 10 महिन्यापूर्वीच करण्यात आले असून त्यावर निकाल अद्यापपर्यंत लागलेला नाही. या सरपंच मुळे गावविकासाचे कामे व ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अतिक्रमण हटविण्यात येत नसल्यामुळे सरपंच अपात्र होण्याची इच्छा गावक-यांनीही दर्शविली असल्याचे सदस्यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्यांसोबतच गावक-यांशी अरेरावी ची भाषा वापरणा-या अश्या सरपंचाला लवकरावत लवकर अपात्र घोषित करावे अन्यथा 6 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात येणार असा इशारा उपसरपंचासह इतर ग्रामपंचायत सदस्य व गावक-यांनी दिला आहे.