‘मामा-भाचा’ यात्रा आजपासून

0
32

सडक अर्जुनी,दि.0१: तालुक्यातील गिरोला (हेटी) येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी १ जानेवारीपासून दोन दिवसीय ‘मामा-भाचा’ यात्रेला सुरुवात होत आहे. गिरोला येथील मामा-भाचा देवस्थान समितीच्यावतीने दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच या यात्रेचे आयोजन केले जाते. काही वर्षापूर्वी देवस्थानाच्या जागेवर शेजारी-शेजारी उभ्या असलेल्या दोन ‘साजा’ ग्रामीण भाषेत ‘येन’ प्रजातीचे दोन उंचच-उंच झाडे नागरिकांच्या लक्षात आली. यातील मोठे झाडे म्हणजे ‘मामा’ आणि लहान झाड म्हणजे ‘भाचा’चे प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले. ही झाडे नागरिकांची र्शद्धास्थान बनली. या देवस्थानाच्या मदतीकरिता दरवर्षी देवस्थान समिती व परिसरातील गिरोला (हेटी), सातलवाडा व खोडशिवनी येथील ग्रामस्थांनी १५ वर्षापूर्वी ‘मामा-भाचा’ यात्रेला प्रारंभ केला. या यात्रेला दूरवरून हजारो भाविक हजेरी लावतात. ‘मामा-भाचा’ यात्रा गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यांच्या सिमेवर भरत असून या यात्रेत दोन्ही जिल्ह्यातील भाविक मोठय़ा संख्येने येतात. ही यात्रा नवीन वर्षाच्या पावन पर्वावर भरत असल्याने यात्रेकरू नवीन वर्षाचे स्वागत मोठय़ा उत्साहाने या ठिकाणी साजरा करतात. परंतु या देवस्थानाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या परिसराच्या पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. २ जानेवारीला २ वाजता आयोजन करण्यात आले आहे आणि १ जानेवारीला ज्योत प्रज्वलन करून यात्रेची सुरुवात करण्यात येईल. या कार्यक्रमात उत्सव, प्रवचन, नाटक, तमाशा आदी कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ‘मामा-भाचा’ देवस्थान समितीचे सदस्य श्यामराव कापगते, देवराम सुपारे, सेवाग्राम चांदेवार, दामोदर बांगरे, रामदास दरवडे, लेखराम कापगते, रमेश कापगते, हरिचंद्र वलथरे, आशिष दरवडे, नामदेव कापसे, राजाराम बांगरे, दिगंबर नागडे यांनी केले आहे. गिरोला येथे रात्री नवयुवक कलाकुंज बालनाट्य मंडळ गिरोला (हेटी) यांचे सौजन्याने झाडीपट्टी मराठी रंगभूमी वडसा प्रस्तुत संगीत ‘माहेरची साडी’ या तीन अंकी नाटकाचे आयोजन केले आहे. या नाटकाचे उद््घाटन भंडारा शिवसेना जिल्हा उपप्रमुख लवकुश निर्वाण यांचे हस्ते व गोंदिया वन्यजीव संस्था संचालक सावन बहेकार यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. नाटकाचे उद्घाटक सौंदड येथील उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ता संदीप मोदी, नाटकाचे रंगमंच पूजक अश्‍विनीभाई पटेल, जितेंद्र समरित, जि.प. सदस्य रमेश चुर्‍हे, तालुका भाजप अध्यक्ष विजय बिसेल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. तसेच बाळनाट्य मंडळ गिरोला हेटी यांच्या सौजन्याने सुयोग झाडीपट्टी रंगभूमि देसाईगंज (वडसा) निर्मित संगीत ‘नको मारू-माझे बाळ’ हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. या नाटकाचे उद्घाटक गंगाधर परशुरामकर जि. प. सदस्य यांचे हस्ते, मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विशेष पाहुणे म्हणून सरपंच डी.यू. रहांगडाले, डॉ. अविनाश काशिवार, पार्वताबाई चांदेवार, इंदुबाई परशुरामकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सातलवाडा येथे श्री मित्र मंडळाच्यावतीने ‘राष्ट्रीय संगीत दुय्यम खडा तमाशा’चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद््घाटन सरपंच रामचंद्र कोहळे यांच्या हस्ते व शैलेष गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. या यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन ‘मामा-भाचा’ देवस्थान समितीने केले आहे.