स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेत सहभागी व्हा-डॉ.राजा दयानिधी

0
14

गोंदियाŸ,दि.०१: शौचालयाप्रती अभिमानास्पद व स्वामित्व भावना वाढीस लागण्यासोबतच शौचालय स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वचछ सुंदर शौचालय स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत जिलह्यातील सर्व कुटुंबांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
१ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा राबविण्यात येणार आहे. स्पर्धेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाने त्यांचे वैयक्तीक शौचालय नव्याने रंग देवून स्थानिक कलांच्याद्वारे त्यावर स्वच्छता संदेशांची निर्मिती करणे अभिप्रेत आहे. यात स्वच्छ भारत मिशनच्या लोगोचा देखील वापर करता येणार आहे. गोंदिया जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. ग्रामीण भागात शौचालयाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे आता जिलह्याची वाटचाल शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने होत आहे. प्रत्येक व्यक्तीने शौचालयाच्या वापर करण्यासह शश्वत स्वच्छता टिकविण्याचा देखील स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. दरम्यान, सर्वाधिक शौचालय रंगविलेल्या तीन उत्कृष्ट जिलह्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात येणार आहे. या तीन जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीने छायाचित्र राज्यस्तरावर पाठवायचे आहेत. राज्यस्तरावरुन राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारासाठी नामनिर्देशन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाèया जिल्ह्यासह कुटुंबाचा देखील राष्ट्रीय स्तरावर पेयजल व स्वच्छता मंत्रालय मार्फत गौरव केला जाणार आहे. जिल्हास्तरावर देखील उत्कृष्ट शौचालय, उत्कृष्ट ग्रामपंचायत आणि उत्कृष्ट तालुक्याचा गौरव करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. केंद्र शासनातर्फे आतापर्यंत विविध स्पर्धा राबविण्यात आलेल्या आहे. मात्र स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा ही संपूर्ण कुटुंबासाठी आयोजित केलेली एकमेव स्पर्धा आहे. जिल्ह्यातील सर्वच कुटुंबियांनी आपल्या कल्पकतेला वाव देवून आपले रशौचालय स्वच्छ, सुंदर ठेवण्यासह त्यावर स्वच्छतेच्या संदेशांची देखील निर्मिती करावी, शलेय विद्यार्थी व महाविद्यालयांनी देखील यात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रााजा दयानिधी यांनी केले आहे.