फुलचूरटोलासाठी पाणी पुरवठा योजना लवकरच-आ.अग्रवाल

0
8

गोंदिया दि.०१:: फुलचूर व फुलचूरपेठ या दोन्ही गावांना शहरी सुविधा देऊन विकसित करण्याची आमची योजना आहे. त्याअंतर्गत दोन्ही गावांना जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी योजना मंजूर करविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले.

ग्राम फुलचूरटोला येथे १५ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर ग्रामपंचायत ते सेल्स टॅक्स कॉलनी रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, ग्राम फुलचूर व फुलचूरटोला या गावांचे विकसीत चित्र आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाचे फलीत असल्याचे मत व्यक्त केले. तर पंचायत समितीच्या माजी सभापती स्नेहा गौतम यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांनीच विकास कामांना नवी गती मिळाल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, लता दोनोडे, चमन बिसेन, योगराज उपराडे, पुष्पलता मेश्राम, जिवन बंसोड, प्रकाश रहमतकर, उर्मिला दहिकर, श्याम कावळे, इंदिरा कटरे, दिनेश तिडके, गंगाराम बावनकर, राजा बैस, रवि बोदानी, निशा उईके, अर्चना राऊत, जैतुरा बावने, उपमा पशिने, अशोक लिचडे, अशोक इटानकर, मनीष गौतम, लक्ष्मी कटरे, आशा मेश्राम, गुनराज ठाकरे, उमेश पंजारे, मुकेश लिल्हारे, महेश अंबुले, देवचंद बिसेन, दुर्गाप्रसाद नागपुरे, सुनिता सवालाखे, सत्यभामा कवास, सुशिला नेवारे, मिना देवगडे, मनोहर कटरे, कस्तूर बिसेन, तेजराम भांडारकर, राजेश कटरे, योगराज अंबुले, झिंगर पटले, दामोदर भांडारकर, गोविंद पटले, महेश नेवारे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.