स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दि. १ ते ३१ जानेवारी कालावधीत ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा

0
19

वाशिम,दि.0१: स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत दि. १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय असुन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग नोंदवावा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) सुदाम इस्कापे यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामिण भागातील ग्रामस्थांना शाश्वत स्वच्छता राखण्यात यावी. प्रत्येक कुंटुंबाला शौचालय आपले वाटावे. त्याप्रति अभिमानास्पद स्वामित्व भावना वाटावी. स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात. शौचालय स्वच्छ सुदर दिसावे. हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचा सहभाग असणार असुन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व कुंटुबांनी आपली वैयक्तिक शौचालय रंगवुन त्यावर स्वच्छतेचे संदेश, स्वच्छता विषयक जाणीव जागृती करण्याची चित्रे यांची निर्मिती करावयाची आहे.
१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ या अभियान कालावधीत उत्कृष्ट काम केलेल्या राज्य, जिल्हा, कुंटुब यांची राज्यस्तरावर पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडुन स्थापन केलेल्या समिती कडुन निवड करुन राज्यस्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थानी या अभियान काळात सहभाग नोंदवावा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले आहे.