मुख्य बातम्या:
प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल# #ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय# #ओबीसीच्या जनगणनेसाठी लढा हाच पर्याय-डाॅ.ज्ञानेश्वर गोरे# #बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल# #अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित# #महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसींसाठी अंदाजे 20 हजार कोटींची तरतूद करावी : आमदार गजभिये# #वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन# #२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन# #शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे# #नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

नागरी सेवा परीक्षेची मुलाखत लवकरच नागपुरात :प्रमोद लाखे

नागपूर,दि.02 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (युपीएससी) परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढावा, या उद्देशाने लवकरच नागपूर येथे अंदाजे १४ व १५ जानेवारीदरम्यान अभिरुप मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राचे (प्री-आयएएस कोचिंग सेंटर) संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘माध्यम संवादङ्क कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते.
युपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेला आणि महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या कोणताही उमेदवार या अभिरुप मुलाखतीला उपस्थित राहून मार्गदर्शन मिळवू शकेल. त्यासाठी तो प्री-आयएएस कोचिंग सेंटरचा उमेदवार नसला तरी चालेल, असे सांगून संचालक लाखे यांनी केंद्रीय नागरी परीक्षेतून मराठी टक्का वाढावा, हा मुख्य हेतू या अभिरुप मुलाखती घेण्यामागे असल्याचे स्पष्ट केले. राज्यात मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर आणि नाशिक असे सहा प्रशिक्षण केंद्र असून, एकट्या नागपुरातील केंद्रामधून आजपर्यंत १०१ उमेदवार शासनसेवेत दाखल झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे या केंद्रामधून परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये विविध विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभते. तसेच त्यांना या कालावधीत पूर्वीच्या २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये विद्यावेतनही दिले जाते, असेही डॉ. लाखे यांनी सांगितले.
सन २०१५ पर्यंत या केंद्रात केवळ ६० उमेदवारांना परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याची मर्यादा होती. मात्र, २०१५ नंतर १२० उमेदवारांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यात सन २०११ पासून १० अल्पसंख्यांक, व सन २०१६ पासून १० बार्टी (अनुसूचित जाती) असे एकूण १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. आजपर्यंत या केंद्रातून १३ आयएएस, ११ आयपीएस, २ आयएफएस, २ भारतीय वनसेवा आणि इतर अनुषंगिक सेवांमध्ये ७३ अधिकारी सेवा बजावत असल्याचे लाखे यावेळी म्हणाले.
राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रशासकीय सेवा व तत्सम विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाक्तया नागपुरातील उमेदवारांचे प्रशासनातील प्रतिनिधित्व वाढावे. त्यांच्यातील वैयक्तिक त्रुटी दूर करणे, सामाजिक विषयांना अद्ययावत करणे, तथा युपीएससी उमेदवारांना गुणात्मक प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने या संस्थेत सत्र २०१८ च्या तुकडीपासून संस्थेतर्फे अभिरुप मुलाखत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. संस्थेतून २०१८ ची मुख्य परीक्षा उतीर्ण झालेले विद्यार्थी व संस्थेशी संबंधित नसणारे परंतु, नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले बाहेरील विद्यार्थीही यात सहभागी होऊ शकतात. या अभिरुप मुलाखती जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल. राज्यातील अनेक उमेदवार मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीची तयारी करण्यासाठी पुणे, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये जात असत. त्यामध्येही तेथील कोचिंग क्लासेसचे शुल्क वेगवेगळे, शिवाय तिथे राहण्याचा खर्च सर्वसामान्य मुलांला परवडेलच असे नाही. त्यामुळे मराठी उमेदवारांची ही अडचण दूर करुन त्यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न अभिरुप मुलाखती घेऊन सोडवता येणार आहेत, त्यातून मराठी उमेदवारांचे युपीएससीमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण नक्कीच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share