पेट्रोल आणि डिझेलच्या उतरत्या भावाने सामान्यांना दिलासा : विनोद अग्रवाल

0
10

गोंदिया  दि. ०२ : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल चे भाव सातत्याने कमी होत असून नरेंद्र मोदी यांची विदेशनीती पूर्णपणे यशस्वी ठरलेली आहे. इराण कडून कच्च्या तेलाची आयात करू नका असा सज्जड दम अमेरिकेकडून भारताला देण्यात आला होता. मात्र भारताने अमेरिकेच्या कुटनीती पुढे न झुकता इराण कडून कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवली याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर झाला आणि परिणामी कच्च्या तेलाचे भाव गडगडले ज्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर मोठ्या प्रमाणात अंकुश लावण्यात मोदी सरकारला यश आल्याचे प्रतिपादन जि. प. माजी उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.

तालुक्यातील दासगाव येथे आयोजित 25/15 योजने अंतर्गत 2 लाखांच्या शहीद बिरसा मुंडा चावडीच्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रामराज जी खरे ( प.स. सदस्य दासगाव खुर्द), सरपंच मायाताई कोल्हे, सूर्यभान चव्हाण उपसरपंच हे सुद्धा उपस्थित होते. पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले की सध्या देशात 10 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल चा वापर सुरू आहे जे उसापासून तयार होते पण त्याच उत्पादन शुल्क जवळपास 43 रुपये प्रति लिटर च्या आसपास आहे. पुण्यात मिथेनॉल मिश्रित पेट्रोल ची चाचणी सुरू आहे ती यशस्वी झाल्यास पेट्रोल आणखी 10 ते 15 रुपये स्वस्त होऊ शकते. त्यात मिथेनॉल कोळशापासून तयार होत असून पर्यावरणासाठी सुद्धा पूरक आहे आणि अशा इनोव्हेटीव्ह सरकार च्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे कारण नुसते नाल्या आणि रस्ते बांधूनच विकास होत नसतो तर असे निरनिराळे प्रयोग सुद्धा करावे लागतात असे मत यावेळी विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले.या वेळी सुकलालजी बोपचे (ग्रा.प. सदस्य ), योगेश निखाडे (ग्रा.प. सदस्य ), गौरीशंकर कोल्हे (ग्रा.प. सदस्य ), ममताबाई तुडसाम (ग्रा.प. सदस्य ), कविताबाई रहांगडाले (ग्रा.प. सदस्य ), ममताबाई दुधबुरे (ग्रा.प. सदस्य ), त.मु.अध्यक्ष श्री. वसंतराव चौधरी, जानेश्वर वैध, संदीप बडगुजर, भाऊलाल तुडसाम, मुकेश तुडसाम, सुरेंद्र भगत, राहुल बोरकर, राजू खरे, माधव रहांगडाले, अमृत रहांगडाले, प्रवीण धामडे, सोनू बिसेन, सचिन बडगुजर, महेश बिसेन, रामलाल तुडसाम, सतीश कोल्हे, राजू चौरे,लक्ष्मण पटले, सुरेश दुधबुरे, देवेंद्र रहांगडाले आणि अन्य गावकरी बांधव तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.