‘पतंजली’चे पितळ उघड

0
10

वर्धा,दि.03 : आमचे तेल “कोलेस्ट्रॉल’मुक्त असल्याची जाहिरातबाजी करणाऱ्या “पतंजली’चे पितळ अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडे आहे. पतंजलीचे खाद्यतेल वनस्पती बियांपासून बनत असल्याने त्यात कोलेस्ट्रॉल हा घटक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खाद्यतेलात नसलेल्या घटकाचा उल्लेख जाहिरातीत केल्याप्रकरणी “एफडीए’ने “पतंजली’विरोधात नागपूरमधील न्यायनिर्णय अधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल केली आहे. संबंधित गुन्हा सिद्ध झाल्यास “पतंजली’ला 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.”पतंजली’ने रिफाइंड सोयाबीन ऑइल, रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल, पतंजली व्हर्जिन ऑइल व पतंजली एक्‍स्ट्रॉ व्हर्जिन ग्राउंडनट ऑइल या खाद्यतेलांच्या लेबलवर “कोलेस्ट्रॉल फ्री’ आणि “झीरो कोलेस्ट्रॉल’ असे लिहिले आहे. खाद्यतेल वनस्पती बियांपासून बनत असल्याने यात कोलेस्ट्रॉल हा घटक नसल्याचे अन्न व औषधी प्रशासन विभागाचे म्हणणे आहे. या कंपनीने अन्नसुरक्षा मानक कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने एफडीएनेही ही याचिका दाखल केली आहे.