ठिकठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

0
32

गोंदिया,दि.03ः-.महामाया बौध्द महिला समिती नगपुरा (मुर्री) द्वारा सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम मुर्रीचे पोलीस पाटील श्री. प्रविण कोचे यांचे अध्यक्षतेखाली व माजी सरपंच सौ. प्रतिमाताई वालदे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये बौध्द विहार मुर्री याठिकाणी साजरी करण्यात आली.
अध्यक्षीय संबोधनामध्ये पोलीस पाटील प्रविण कोचे यांनी ज्याप्रमाणे आई सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिकवणीप्रमाणे प्रथम स्वतः शिक्षण घेवून अन्य महिलांना शिक्षीत केले, त्यावेळची परिस्थिती फार वाईट होती, सामाजीक बुराई वाढलेली होती, महिलांना शिकवण्यासाठी जात असतांना असामाजीक लोकं त्यांच्या अंगावर शेण वगैरे फेकून त्यांना त्रास देत होते. अशा बिकट परिस्थितीमध्येही त्यांनी मुलींची पहिली शाळा उघडली व शिकविले. खऱ्या अर्थाने महिला शिक्षणाची आराध्य दैवत आई सावित्रीबाई फुले ही आहे. यांच्याच पुण्याईने आज महिला सर्वच क्षेत्रात नाव लौकीक मिळवत आहेत. असे आदर्श स्वरुप आई सावित्रीबाई फुले यांचे आदर्श सर्वांनी अंगिकारावे, असे उपस्थितांना आव्हान केले.”
माजी सरपंच प्रतिमाताई विरेंद्र वालदे, महामाया बौध्द समिती अध्यक्षा सौ. नवनिताबाई सुभाकर दरवडे, सौ. शालुबाई नितीन साखरे, श्रीमती. कविताबाई केलाश अंबादे यांनीही संबोधित केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महामाया बौध्द समिती मुर्री च्या महिला पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.संचालन सत्यशक्ती हेमंत धमगाये यांनी तर
आभार सपना उमाकांत साखरे यांनी मानले.

छत्रपती विद्यालयाता सावित्रीबाई जयंती उत्साहातः- आमगाव तालुक्यातील छत्रपती विद्यालय सितेपार विद्यालयात मुख्याध्यापक एम.एस.पटले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी निबंध व वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला.कायंक़माचे संचालन व्ही.आर.मरकाम व आभार ओ.एम. बोपचे यांनी मानले.

परशुराम विद्यालय मोहगावःः गोरेगाव तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु.गोरेगाव येथे “क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले”यांची १८८वी जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे हे होते.मुख्याध्यापकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व्ही.एस.मेश्राम यांनी केले.आभार प्रदर्शन पी.एम.चुटे यांनी केले. याप्रसंगी शालेतील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.