साविञीबाई फुले यांचे विचार प्रेरणादायी : इंजी. दयाल भोवते

0
18

लाखांदुर, दि. 3: साविञीबाई फुले यांचे विचार समाजाला योग्य दिशा व प्रेरणा देणारे असुन विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार आचरणात आणुन यशाचे शिखर गाठावे असे मत इंजी. दयाल भोवते यांनी व्यक्त केले. ते लाखांदुर येथे आयोजीत क्रांतीज्योती साविञीबाई फुले जयंती दिनी बोलत होते.लाखांदुर येथील मिशन अधिकारी स्पर्धा परीक्षा केंद्र येथे दि. 3 जानेवारीला बालिका दिन साजरा करण्यात आला .याप्रसंगी सर्वप्रथम साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलीत करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
पुढे ते म्हणाले की, थोर महापुरूषांच्या विचारांची जाणीव होऊन त्या मार्गाने चालण्यासाठीच महापुरूषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात.
याप्रसंगी उपाध्यक्ष म्हणुन लाभलेल्या शितल मेश्राम यांनी विद्यार्थ्यांनी साविञीबाई फुले यांचा आदर्श बाळगून पुढील वाटचाल करावी असे प्रतिपापादन केले.
कार्यक्रमाचे संचालन चंद्रसेन चामलाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौरभ बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्रीकांत लुटे , प्रविण रंगारी, अमित मेंढे, प्रियंका मेंढे, सोनु बुरडे, किरण मेश्राम, काजल कोहाट, श्रद्धा टेंभुर्णे , प्रियंका भोवते , स्नेहल दिवठे व अन्य विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.