इसापूर इटखेडा कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती

0
14

अर्जुनी मोरगाव,दि.04ः- भारतीय समाजात महीलांना सन्मान मिळवून देण्यासाठी समाजातील धर्ममार्तंड लोकांच्या विरोधात बंड करून महीलांना शिक्षणाची दारे उघडून प्रत्यक्षात स्वतः शिक्षिकेची भुमिका स्विकारली आणि शैक्षणिक क्रांती घडवून आणली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त इयता पाचवी ते बारावी पर्यंत च्या मुलामुलींनी ” बेटी बचावो बेटी पढावो ” “मुलींना शिकवा मुलींना वाचवा” या विषयावर भाषण आणि गितगायण स्पर्धेत सहभागी होऊन सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परीचय करुन दिला. तसेच बालिका दिन ते युवक दिन आणि गणराज्य दिनापर्यत विविध उपक्रम राबवुन बेटी बचावो बेटी पढावो अभियानाचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य देविदास नाकतोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेश धोटे ,बालाजी मस्के, प्रा.अरुण पारधी,प्रा.सतपुरूष शहारे,सौ.पदमजा मेहंदळे, राजेश डोंगरवार, धर्मपाल तोंडरे, मनोज डोंगरे,पुर्णचंद्र धोटे, रामेश्वर जाधव,पतीराम पुराम, धनेश तोंडरे उपस्थित होते.
याप्रसंगी भाषण आणि गितगायण स्पर्धेत युगल कुंभलवार, मुगनयनी रोकडे, चेतना गोंडाणे, सिमरण जांभुळकर,चायना शहारे, मंजिरी वैद्य, भाग्यश्री देशमुख, सौरभ मैंद,रितेश चौधरी, विनित वांढरे,प्रज्वलि गोंडाणे,छगन दाणे या विद्यार्थ्यांनी भाषणे आणि गित स्पर्धेत सहभाग घेतला.बेटी पढावो बेटी अभियाना निमित्ताने गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.भगवंत फुलकटवार यांनी केले तर आभार प्रा.सतपुरूष शहारे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंबादास कासार, कमलाकर बनकर, कविश्नर ठाकरे, संघपाल बनसोड यांनी सहकार्य केले.