प्रोग्रेसिव्ह शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

0
30

गोंदिया,दि.05 : श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूल्समध्ये चार दिवसीय वार्षिक क्रीडा व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पालकवर्ग व संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, उपाध्यक्ष अल्का कटकवार, संस्था सचिव डॉ. निरज कटकवार व सहसचिव पद्मा कटकवारांद्वारे मां शारदा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. वार्षिक क्रीडा संमेलनात विविध प्रतियोगिताचे आयोजन करण्यात आले.
यात लेझीम, डम्बल्स, म्युजिक पी. टी., स्कीपींग, मनोरे, कुरास, दौड, फुटबॉल, रिले रेस, थ्रो बॉल, संगीत कुर्सी, कंगारू रेस तर स्नेह संमेलनात लोकनृत्य, पारंपारिक नृत्य, देशभक्ति नृत्य व नाटक चिमुकल्या विद्यार्थी द्वारे सादर करण्यात आले. यावेळी संस्थासचिव डॉ. कटकवार यांनी सांगितले की, प्रोग्रेसिव्ह शाळा नेहमी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी तत्पर आहे. तसेच उत्कृष्ठ शिक्षण, वेगवेगळय़ा स्पर्धेचे आयोजन केला जाते. दरम्यान उत्कृष्ट कलाकृति सादर करणार्‍या विद्यार्थींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ओ. टी. रहांगडाले, कुमुदिनी तवाडे, वाय. आशा राव, अभय गुरव, दयावंता राऊत, विशाल पशिने, विणा कावळे, निधी व्यास, कृष्णा चव्हाण, कुलदिप भौतिक, वर्षा सतदेवे, मिनाक्षी महापात्रा, रूपकला रहांगडाले, विकास पटले, प्रमोद वाडी, अर्चना भोयर, कल्याणी रहांगडाले, रिना साहू, तुमेश पारधी, भानुलता लावेटी, स्मिता शुक्ला, सिमरन बास्के, राहुल रामटेके, दिव्यांशु जैसवाल व सर्व शिक्षक एवं शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.