राज्यस्तरीय राष्ट्रज्योती गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा ६जानेवारी रोजी

0
16

नाशिक,दि.५ः- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने रविवार दिनांक ६ जानेवारी रोजी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय राष्ट्रज्योती गुणवंत शिक्षक पुरस्कार २०१९ चे वितरण नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक येथे करण्यात येणार आहे. व राज्यस्तरीय शैक्षणिक डॉक्युमेंटरी स्पर्धा विजेते सत्कार ,तसेच विचारोत्सव २०१९ विशेषांक प्रकाशन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.

याशिवाय शिक्षकांसाठी शैक्षणिक विचारवंत माननीय हेरंब कुलकर्णी यांचे विद्यार्थी सक्षमीकरणात शिक्षकांची भूमिका या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी मालेगाव माननीय लक्ष्मणजी राऊत ,शिक्षण उपसंचालक रामचंद्रजी जाधव ,जि.प.उपाध्यक्ष नयनाताई गावित, शिक्षण सभापती यतींद् पगार, जिल्हा शिक्षणाधिकारी वैशाली झनकर,राज्यअध्यक्ष शामराव जवंजाळ , राज्य सचिव राजेंद् म्हसदे, संतोष काटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी राज्यातील शिक्षकांनी व शिक्षण प्रेमींनी कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, जिल्हा सरचिटणीस बाबूलाल सोनवणे, कार्याध्यक्ष कैलास बोढारे, अनिल बागुल, प्रल्हाद हूवाळे,सिद्धार्थ सपकाळे, दिलीप वाघमारे,सुनील मोरे,सुनिल सुर्यवंशी यांनी केले आहे.