ब्लॉसम पब्लिक स्कुलमध्ये आनंदमेळा उत्साहात साजरा

0
10

देवरी:दि.5ः-ब्लाॅसम स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सुरू झाले असून त्याप्रसंगी आनंदमेळाचे आयोजन प्राचार्य डॉ सुजित टेटे यांनी केले होते.उदघाटनाच्या याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जुगणु भाटिया व हरप्रितकौर भाटिया (सुख सागर हॉटेलचे संचालक) निरीक्षक , निर्मल अग्रवाल (सचिव कल्पवृक्ष सोसायटी), डॉ. सुजित टेटे प्राचार्य ब्लॉसम स्कुल मंचावर उपस्थित होते.फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आनंदमेळा मध्ये 60 विध्यार्थ्यांनी आपापले स्टॉल्स लावले होते . प्रत्येक स्टॉल्सचे निरीक्षण करून सर्वांना गुणदान करण्यात आले.विध्यार्थी जिवनात व्यावसायिक ज्ञान मिळावे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशासाठी विभागाचे नितेश लाडे आणि विश्वप्रीत निकोडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.सूत्रसंचालन वैशाली मोहुर्ले यांनी मानले असून आभार प्रदर्शन वैशाली टेटे यांनी मानले.