सीएम चषकाचा समारोप ६ रोजी गोरेगावात

0
12
गोंदिया,दि.५ः- २९ डिसेंबर पासून भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे सुरु असलेल्या जिल्हास्तरीय सीएम चषक क्रिडा व कला महोत्सवाचे पारितोषिक वितरण कार्यक्रम रविवारी, ६ जानेवारी रोजी गोरेगाव येथे शहीद जाम्या-तिम्या विद्यालयात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमाला टीव्ही झी-मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या चे  प्रसिध्द कलावंत भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सतीश सोनोने, सागर करंडे, अभिजीत तेलंग, गणेश मोडक, रोहीत राऊत आदी जिल्हावासीयांच्या भेटीला येत आहेत. यावेळी गीत व नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले राहतील. यावेळी प्रामुख्याने आ. अनिल सोले, आ. डॉ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम,माजी खा. चुन्नीलाल ठाकूर, माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. केशव मानकर, खोमेश रहांगडाले, भजनदास वैद्य, भेरसिंग नागपुरे, हरीश मोरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, रचना गहाणे, संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले, जिप उपाध्यक्ष अलताफ हमीद, शैलजा सोनवाने, पंस सभापती अरविंद शिवणकर, गिरधर हत्तीमारे, नप उपाध्यक्ष शिव शर्मा, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर,  तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, सुनिल केलनका,  भाऊराव कठाणे, विजय बिसेन, उमाकांत ढेंगे, प्रमोद संगीडवार, परसराम फुंडे, येसूलाल उपराडे, धरेंद्र अटरे, सुरेश रहांगडाले आदी उपस्थित राहणार आहेत. अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, महामंत्री ॠषीकांत साहू, ललीत मानकर, पंकज सोनवाने, अभय मानकर, रोहीत अग्रवाल व सर्व युवा मोर्चा पदाधिकाèयांकडून करण्यात आले आहे.