पोलिस स्थापना दिनानिमित्त महिला सुरक्षा जनजागृती

0
9

गोंदिया,दि.05 : स्थानिक सुभाष गार्डन येथे महिला पोलिस, स्वयंसेवी संस्थांचे महिला, कराटे अ‍ॅकडमीचे महिला खेळाडू आदी महिलांनी धाडसी कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमातून महिलांनी सशक्तीकरणाचा संदेश दिला. महाराष्ट्र पोलिस स्थापना दिननिमित्त जिल्हा पोलिस महिला, स्वयंसेवी संस्था व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सहकार्याने सुभाष गार्डन येथे महिला सुरक्षेसंदर्भात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तत्पूर्वी पोलिस विभागातर्फे
शहरात महिला सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली इंदिरा गांधी स्टेडियम, नेहरू चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक मार्गाने सुभाष गार्डन येथे पोहोचली.

या रॅलीमध्ये विशेषत: धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय,एस.एस. गल्र्स कॉलेज, साकेत शारीरिक शिक्षण महाविद्यालय,मनोहरभाई पटेल औषधी निर्माण महाविद्यालय, सरस्वती महिला विद्यालयातील जवळपास २५० ते ३०० विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या होत्या. यानंतर सुभाष गार्डन येथे जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान महिला पोलिस जनार्दन कुसराम व त्यांच्या पथकाने महिला संरक्षण व सुरक्षा यावर प्रात्याक्षिक सादर केले. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींनी विविध
कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात सहभागी होणार्या विद्यार्थिनी व महिलांना पोलिस विभागातर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले.या कार्यक्रमात प्रामुख्याने जिल्हा पोलिस अधीक्षक हरिष बैजल, पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम, वामाचे श्रीमती संगीता घोष यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर घोरमोडे, कमलाकर घोटेकर, दिपक गेडाम यांनी विशेष परिश्रम घेतले.