किरसान मिशन शाळेत सावित्रीबाई फुले जयंती

0
17

गोरेगाव,दि.06ः- निक किरसान मिशन ज्यू कॉलेज गोरेगाव येथे ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नामदेव किरसान होते तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. विनोद उके होते. डॉ. किरसान यांनी यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकले व म्हणाले ब्रीटीश काळात स्त्री शिक्षणासाठी लढा देऊन व पहिली स्त्री शिक्षीका होऊन यांनी महान समाजसुधारकाचे कार्य केले. यावेळी शाळेत जी.के. परीक्षेत प्रथम आलेली कु. सलोनी हरिणखेडे हिला सुवर्ण पदक देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे संस्थपक आर.डी.कटरे तसेच प्राचार्य मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली मते व्यक्त केली.आर डी कटरे यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्याचबरोबर शाळेत गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या माध्यमाद्वारे महिला शिक्षकाचे सत्कार करण्यात आले.

शहारवाणीः-स्व. ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी ता.गोरेगाव या शाळेत “क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले”यांची १८८वी जयंती “बालिका दिन “म्हनून साजरी करण्यात आली.सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या सहायक शिक्षीका कू. ओ. बी. ठाकरे ह्या होत्या.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर. वाय. कटरे व अनेक विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात कू. ओ. बी. ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी वीद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या पर्वावर आयोजित वर्ग सजावट स्पर्धेचे पारितोषक वितरन करण्यात आले.संचालन कू. चायना येळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन कू. सोनाली पटले यांनी मानले.