ओबीसी महिला सेवा संघाचे जिल्हा अधिवेशन १९ रोजी

0
6

गोंदिया,दि.०६:: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त ओबीसी महिला सेवा संघाचे जिल्हा अधिवेशन शनिवार (दि.१९) सकाळी ११ वाजता बावणे कुणबी समाज मंडळ पोलीस स्टेशनच्या मागे भंडारा येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ओबीसी महिलांची समस्या, ओबीसी महिलांचे शैक्षणिक मागासलेपणाचे कारण व समाधान, ओबीसी महिलांचे समाजाप्रती योगदान, ओबीसी महिलांचे सामाजिक-राजकीय प्रतिनिधीत्व यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी उद्घाटक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघ महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष इंजि. नरेंद्र गद्रे, मार्गदर्शक म्हणून बालरोगतज्ञ डॉ. अभिलाषा देहरे (गावतुरे), सुनिता हुमे, प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी महिला सेवा संघाचे अध्यक्ष मंगला वाडीभस्मे, ओबीसी सेवा संघाचे उपाधयक्ष अनिता बोरकर, सदानंद इलमे, स्वागतामध्यक्ष म्हणून ओबीसी महिला सेवा संघाच्या अध्यक्षा मंजुषार बुरडे तर संचालन प्रा.डॉ. जयश्री सालोकर करणार आहेत.