युवाशक्तीने नवराष्ट्र निर्मितीसाठी पुढे यावे-नाना पटोले

0
17

अर्जुनी मोरगाव, दि. ०६ : : कृषीप्रधान देशातील शेतकरी शेतमजूर यांच्या स्वप्नांचा चुराडा विद्यमान केंद्र व राज्य सरकारने केला असून शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार
यांना देशाधडीला लावण्याचे काम करीत आहे. शेतकर्यांच्या मालाला खर्चावर आधारीत भाव मिळत नाही तर दुसरीकडे परदेशातून कांदा, साखर, धान्याची आयात
होते. युवाशक्तीला रोजगार देणारे, असे सरकारची आश्वासनाची जुमले धराशायी कोसळत आहेत. आपण नुकतेच नववर्षाचे स्वागत केले आहे. आता युवाशक्तीने नवराष्ट्र निर्मितीसाठी पुढे यावे, असे आवाहन अखिल भारतीय शेतकरी, शेतमजूर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार नानाभाऊ पटोले यांनी केले आहे.
युवाशक्ती ग्रामीण विकास बहुउद्देशिय मंडळ इटखेडाव्दारे नववर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडांगण ग्रामपंचायत ईटखेडा येथे सुप्रसिध्द कव्वाल हाजी मजीद
शोला यांचे कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील हनुमान मंदिराच्या कळस निर्मितीचा पुढाकार युवाशक्ती मंडळांनी घेतला त्या कळसनिर्मितीचे विधीवत पुजन नानाभाऊ पटोले यांनी केले.
कार्यक्रमाला भंडारा को.ऑप.बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी उपसभापती आशाताई झिलपे, नगराध्यक्ष किशोर शहारे,उद्धव मेहंदळे, इंद्रदास झिलपे, राकॉ युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य किशोर तरोणे, सुभाष देशमुख, रत्नदिप दहिवले,नितीन धोटे, बंशीधर लंजे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा उषाताई शहारे, शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले, जि.प.सदस्य गिरीष पालीवाल, राजु पालीवाल, माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, चेतन शेंडे, जयप्रकाश राठोड, भोजेश झिलपे, गणेश फाफट, राकेश अंबानी, तुकाराम सोनवाने आदि मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी, शेतमजूर बहुजनांसाठी सदोदित धडपडत असूलेल्या माजी खासदार नानाभाऊ पटोले यांना युवाशक्ती ग्रामीण विकास मंडळाव्दारे विदर्भरत्न पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सुप्रसिध्द कव्वाल हाजी मजीद शोला, डॉन्सर किशोर वुंâभारे यांना सुध्दा मंडळाचे अध्यक्ष दिपक दुपारे, उपाध्यक्ष संजय कांबळी, सचिव सर्वेश धांडे, नंदकिशोर झिलपे, छबील बुराडे, संजय मेहंदळे, भिवराम मैद यांच्याव्दारे सन्मानित करण्यात आले.इटखेडा गावाच्या विकासाची मुहूर्तमेढ नानाभाऊंनी आमदार ते खासदार पर्यंतच्या कालखंडात रोवली, भरभरून गावाच्या विकासासाठी सहकार्य केले त्यामुळे माजी खासदार यांचा भव्य पुष्पमाळेने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नानाभाऊ पटोले पुढे म्हणाले, देशाची ताकद युवाशक्ती आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा हा देश आहे. परंतु, काही धर्मांध शक्ती संविधानाच्या प्रती देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत जाळतात. त्यांना मोकळे रान आहे. दरवर्षी लाखो सुशिक्षित बेरोजगारांना नोकNया देवू,राज्यात महाभरती होणार हे शासनाचे जुमले हवेमध्येच विरत आहेत. उलट बेरोजगारांनी पकोडे तळावेत असा सल्ला देणाNया सरकारनी युवाशक्तीची घोर निराशा केली आहे.खोटे बोलण्याची वारंवारता रेटून बोलण्याची पराकाष्ठा आता सर्वांनी ओळखली असून या वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी ह्या खोटारड्या सरकारला त्यांची जागा दाखविणे गरजेचे असल्याचे पटोले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन किशोर कावळे यांनी तर उपस्थितांचे आभार संजय कांबळे यांनी मानले.