वर्षाताई पटेल 7 व 8 जानेवारीला गोंदिया-भंडारा जिल्ह्यात

0
8

गोंदिया,दि.06ः-मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षाताई प्रफुल पटेल या उद्या 7 व 8 जानेवारीला गोंदिया व भंड़ारा जिल्हयातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.7 जानेवारीला सकाळी 10 वाजता गोंदिया तालुकास्तरीय स्वदेशी खेळोतेज्जक मंडळाच्या क्रीडासमेंलनाच्या उदघाटनाला कारंजा येथे उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर गोंदिया शिक्षण संस्थेच्या रावणवाडी येथील विद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसमेलनाला दुपारी 1 वाजता उपस्थित राहणार आहेत.सायकांळी 6 वाजता कुडवा येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या खासदार विकास निधीतून तयार  होणार्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन व सायकांळी 7 वाजता  आर.के.बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाला उपस्थित राहणार आहेत.8 जानेवारीला भंडारा येथील जकातदार कन्या विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसमेलनाला सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.दुपारी 1 वाजता शारदा नर्सिंग स्कुल खापा येथे आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित राहून 3 वाजता मोहाडी तालुक्यात आयोजित खासदार चषक कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत.सोबत खासदार मधुकर कुकडे ,माजी आमदार राजेंद्र जैन,भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे आदी उपस्थित राहणार आहेत.