७७६ हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली-आ.रहागंडाले

0
12

तिरोडा,दि.07ः-तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आल्यास परिसरातील शेतकरी सुलाम सुफलाम होतील याच उद्देशाने आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडून जलसंधारणाच्या कामासाठी निधी खेचून आणला. त्यामुळे ७७६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे. तालुक्यात जलयुक्त शिवार अंतर्गत तलाव दुरुस्ती व सभामंडप बांधकामाचे भूमिपुजन प्रसंगी आ.रहागंडाले यांनी हि माहिती दिली.यावेळी माजी उपसभापती डाँ. वसंतजी भगत, सरपंच श्रीमती पारधी,कमलेश आतीलकर, प्रकाश भोंगाडे,रामुभाऊ बाळणे,उपविभागीय अभियंता अनंत जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.
धापेवाडा उपसा सिंचन योजना, लघू पाटबंधारे तलाव, कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती व नाला सिमेंटीकरणाकरिता १६ गावांसाठी २ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला असून यामुळे ७७६ हेक्टर जमिन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने केसलवाडा येथील साठवण बंधारा दुरुस्तीकरिता १८.४९ लाख, खेडेपार येथील बंधारा दुरुस्तीकरिता ३.२0 लाख, कुल्पा बंधारा दुरुस्ती ५.९९ लाख, लेदडा बंधारा दुरुस्ती ३.१९ लाख, मनोरा बंधारा दुरुस्ती ५.४७ लाख, मुरपार बंधारा दुरुस्ती ६.४७ लाख, सिल्ली लपा तलाव दुरुस्ती १५.२५ लाख, सोनेखारी बंधारा दुरुस्ती ९.१८ लाख, मुंडीकोटा कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती ५.६१ लाख, साठवण बंधारा दुरुस्ती १३.५९ लाख, लपा तलाव दुरुस्ती १५.२७ लाख, सिमेंटनाला बांधकाम ६.२८ लाख, खुरखुडी कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती ४.९९ लाख, साठवण बंधारा दुरुस्ती २.६८ लाख, बोदा लपा तलाव दुरुस्ती ५५.४१ लाख, साठवण बंधारा दुरुस्ती ६.७६ लाख, बिहरिया येथील साठवण बंधारा दुरुस्तीकरिता १0.८९ लाख, मामा तलाव दुरुस्ती ६.५0 लाख, किंडगीपार साठवण बंधारा दुरुस्ती १८.0३ लाख, सिमेंटनाला बांधकाम ९.७१ लाख, भुराटोला साठवण बंधारा दुरुस्ती ३.२५ लाख, डोंगरगाव (ख.) साठवण बंधारा दुरुस्ती २.९0 लाख, शासनातर्फे मंजूर करण्यात आला असून यामुळे ७७६.२७ हेक्टर जमिन सिंचनाखाली येवून १२१७.५0 दलघमी जलसाठा निर्माण होणार आहे.