वर्णवादी व्यवस्थेचे षडयंत्र ओळखून बहुजनांनी वाटचाल करावी-अमोल मिटकरी

0
17

गडचिरोली,दि.07ः-आदिवासी काळापासून येथील प्रस्थापित चतूर वर्णवादी व्यवस्थेने भारतीय ओळख व कृषक जात असलेल्या बहुजनांना संधी नाकारल्या आहेत. कारण बहुजन समाजाला संधी दिल्यास हा समाज संधीचे सोनं करेल हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे या व्यवस्थेचे षडयंत्र बहुजनांनी ओळखावे व वाटचाल करावी, असे प्रतिपादन अमोल मिटकरी यांनी केले.
सत्यशोधक विचारमंच गडचिरोलीच्यावतीने शौर्य दिन तथा शाळा स्थापना दिवस, सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने येथील जि. प. हायस्कुलच्या पटांगणात सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा सचिव विलास निंबोरकर होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून भंडाराच्या मूलनिवासी महिला संघाच्या जिल्हाध्यक्षा शरयू डहाट, माळी संघटनेच्या महिला अध्यक्षा सुधा चौधरी, मुख्याधिकारी संजीव ओहोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून वानखेडे, अनिल म्हशाखेत्री, मराठा सेवा संघाचे दादाजी चापले, पत्रकार रोहिदास राऊत, जयकुमार मेश्राम, प्रा. शेषराव येलेकर, राष्ट्रीय ओबीसी युवा संघाचे रूचित वांढरे, दादाजी चुधरी आदी उपस्थित होते.
मिटकरी पुढे म्हणाले, सद्यस्थितीत बहुजनांना सामाजीक, सांस्कृतिक, आर्थिक, कृषी, शिक्षण इत्यादी क्षेत्रात मागे टाकण्याचे कारस्थान सुरु आहे. ‘चाय’ व ‘गाय’ यांना आपण घाबरायला लागलो आहोत. बहुजन हे बळीचे वंशज आहेत. त्यांची भारतीय ही ओळख असून कृषक ही जात आहे. वर्णवादी व्यवस्थेने शिक्षणासारख्या आमुलाग्र परिवर्तन घडविणार्‍या क्षेत्रातील दुधात भेसळ केलेली आहे. त्यामुळे बहुजन समाज गुरगुरतांना दिसत नाही. पुण्याच्या छाताडावर सावित्रीबाई फुले एकटी संघर्ष करीत होती. संविधानाने वारसाहक्क, आरक्षण, मताधिकार, शेतकर्‍यांना हक्क, भाषण स्वातंत्र असे विविध अधिकार दिले. त्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे झाले आहे. तसेच प्रामाणिक माणसांच्या मेहनतीचा पैसा चळवळी चालवित असतो, असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन प्रितेश अंबादे यांनी केले. प्रास्ताविक राज बन्सोड यांनी तर आभार ज्ञानदिप गलबले यांनी