विद्युत कर्मचाऱ्यांचे विदर्भात कामबंद आंदोलन

0
18

गोंदिया/वर्धा,दि.0 ७ ः-आपल्या विविध स्वरूपातील मागण्यांच्या पुर्ततेसाठी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीनही कंपन्यांमधील वीज कर्मचारी व अभियंत्यांनी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात ‘एल्गार’ पुकारला असून सोमवार, ७ जानेवारी रोजी कर्मचा-यांनी कामबंद व एकदिवसीय लाक्षणिक संप केल्याने विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील कामकाज ठप्प पडले आहे. यादरम्यान एकत्र जमत शासन धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, वीज कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यात विजेच्या विविध समस्या उद्भवल्याचा सूर उमटत आहे.गोंदिया,भंडारा,गडचिरोली,चंद्रपूर,वाशिम,वर्धा आदी जिल्हयातही आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

महापारेषणमधील ‘स्टाफ सेटअप’ लागू करताना आधीची मंजूर पदे कमी करू नये, महावितरणमधील प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करूनच अंमलात आणावी, शासन व व्यवस्थापनाकडून राबविण्यात येत असलेले खासगीकरण, फ्रॅन्चाईझी धोरण थांबवावे, मुंब्रा, शिळ, कळवा आणि मालेगावचे विभाग फ्रॅन्चाईझीवर खासगी भांडवलदार कंपनीने देण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, महानिर्मिती कंपनीचे २१० एमडब्ल्यूचे संच बंद करण्याचे धोरण तत्काळ थांबविण्यात यावे, कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, बदली धोरण पुनर्विचार संघटनेसोबत चर्चा करून राबविण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने संप पुकारला. त्यात शेकडो वीज कर्मचाºयांनी सहभाग नोंदविल्याचे दिसून आले. गोंदियातील आंदोलनात सुनिल जगताप,शंकर पहाडे,कुमार कोकणे,विनोद चौरसिया,कृष्णा भोयर,योगेश्वर सोनुले,प्रतिभा मेंढे,आर.के.देवकांत,ओमेश्वरी रहागंडाले,मुकेश्वर टेंभरे,मखेजय चौधरीसह विज कर्मचारी या  सहभागी झाले होते.

वर्धा येथील आंदोलनात सुरेश गोसावी, मनोहर उईके, अरविंद डबुरकर, सचिन सोनस्कर, विवेक कोठारे, संदेश फुलपाटील, खुशाल झाडे, नरेश भारद्वाज, सुनील तडस, डी.एम. देशमुख, दिलीप तडस, मैथीली खटी, राधा बोपचे यांच्यासह महा.स्टेट इले. वर्कर्स, फेडरेशन, महा. वीज कामगार महासंघ (बी.एम.एस.), विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सवॉर्डिनेट इंजिनियर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.