मुख्य बातम्या:
राजनांदगावच्या कंपनीला ५0 लाखांचा ठोठावला दंड# #टंचाईच्या २६४ उपाययोजनांच्या कामांना मान्यता# #प्रलंबित मागण्यांसाठी विज्युक्टाचे निवेदन# #जबरानजोत शेतकर्‍यांचा धडक मोर्चा# #विशाल हृदयी , विविध आयामी : डॉ विशाल बिसेन# #राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री# #इंडियन ऑईलच्या सामाजिक दायित्वातून आज दिव्यांगाना मिळणार सहायक उपकरणे# #गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांच्या नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित# #मुंबई, पुणे व नागपूर महाविद्यालयांमध्ये जागा वाढविण्याचा निर्णय- शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत माहिती# #दुष्काळग्रस्तांना पाणी, रोजगार व चारा छावण्या उपलब्ध- चंद्रकांत पाटील

श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट नांदेड स्पर्धेचे भव्य उदघाटन  

पहिल्या दिवशी पतियाळा, हैद्राबाद आणि डोंरगा रेजिमेंटची विजय सलामी
नरेश तुप्तेवार
नांदेड, दि. 8_-शिरोमणी दुष्ट दमन क्रीडा युवक मंडल नांदेड संचालित ४६ व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट नांदेड स्पर्धेचे उदघाटन सोमवार, दि. ७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता दरम्यान गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजूरसाहिबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, गुरुद्वारा लंगर साहिबचे जत्थेदार संतबाबा बलविंदरसिंघजी आणि यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार तारासिंग यांची उपस्थिती होती. तर इतर पाहुण्याच्या गुरुद्वारा सदस्य सरजीत सिंग गिल, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, राजिंदरसिंघ पुजारी, रंजितसिंघ कामठेकर, इकबालसिंग सबलोक, गुलाबसिंघ कंधारवाले, सुखविंदर सिंग हुंदल, जोगेंद्रसिंघ खैरा, नगरसेवक संदीपसिंग गाडीवाले, मोहनसिंग गाडीवाले, गुरुद्वाराचे अधीक्षक गुरविन्दरसिंघ वाधवा, रंजितसिंघ चिरागीया आदींची उपस्थिती होती. खालसा हायस्कूल एजुकेशन कॅम्पस परिसराच्या मैदानावर क्रीडा ध्वज फडकावून खेळांचे उदघाटन करण्यात आले. मुख्य आयोजक नगरसेवक गुरमितसिंघ नवाब, हरविंदरसिंग कपूर, हरप्रीतसिंघ लाँगरी, जितेंदरसिंग खैरा, संदीपसिंग अखबारवाले यांनी सर्व पाहुण्यांचे शाल आणि हार घालून सत्कार केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जुझारसिंग शिलेदार यांनी केले. या वेळी प्रतिष्ठित नागरिक आणि खेळाडूची उपस्थिती होती. स्पर्धेत एकूण १६ हॉकी संघ सहभागी झाले असून सर्व सामने साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत.
——
पहिल्या दिवशी एन. आय. एस. पतियाळा, ए. सी. जी. हैदराबाद आणि डोरगा रेजिमेंट संघानी आपले साखळी सामने जिंकत विजयी सलामी दिली. तर औरंगाबादच्या अयान क्लब आणि एच. पी. एस. जी. पंचकुला संघांत खेळ्या गेलेला सामना अनिर्णित राहिला.
आजचा पहिला आणि उदघाटन सामना डोरगा रेजिमेंट गाझियाबाद आणि कामठी क्लब नागपूर यांच्यात खेळविला गेला. डोरगा रेजिमेंट ने हा सामना ५ – १ च्या गोल फरकाने जिंकला. खेळाच्या पाचव्या मिनिटातच गोल करून सामन्यावर पकड घेतली. संदीप आणि माणिक शर्मा यांनी दोन – दोन मैदानी गोल करून प्रेक्षकांचे मने जिकंले. दरम्यान १० व्या मिनिटाला नोकेश शर्मा याने गोल केला. १४ व्या मिनिटात दोन्ही संघानी एकमेका विरुद्ध गोल साधत आक्रमक खेळ केला. नागपूर तर्फे प्रदीप मुदंबळे यांनी एकमेव गोल केला. डोरगा रेजिमेंट तर्फे ३९ व ५६ मिनिटाला माणिक शर्मा याने गोल केले. पंच म्हणून अरुण एस. , विजय पी. वी. आणि एडवर्ड डी., तसेच शिरीधरण टी., तांत्रिक कर्मचारी म्हणून नितीन एस. यांनी कामगिरी बजावली.
आजचा दुसरा सामना एच.पी.एस.जी. पंचकुला आणि आयन क्लब हैद्राबाद यांच्यात झाला. हा सामना १ – १ ने अनिर्णित राहिल्या मुले गुण वाटून देण्यात आले. पंचकुला तर्फे खेळाच्या पाचव्या मिनिटाला सुभाष याने मैदानी गोल केला. त्याच्या उत्तरात औरंगाबादच्या संघाने खेळाच्या २५ व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. हा गोल अमान शेख याने केला.
तिसरा सामना ए.सी.जी. हैद्राबाद आणि गुजरात क्लब वलसार यांच्या दरम्यान झाले. चुरशीच्या लढतीत हैदराबाद संघाने २ – १ ने सामना जिंकला. खेळाच्या १७ मिनिटाला गुजरात संघाने पेनल्टी कॉर्नर मध्ये पहिला नोंदवला. नुमान एच. यांने हा गोल केला. हैद्राबादच्या संघाने खेळाच्या ४२ व्या आणि ५८ व्या मिनिटाला गोल करत विजय खेचून आणला. दोन्ही गोल यश पटेल याने केले.
संध्याकाळी खेळविण्यात आलेल्याला सामन्यात एन. आय. एस. पतियाळा संघाने भुसावळ रेल्वे संघावर ६ – ० ने मोठा विजय मिळवला. पटियाळाच्या १७ क्रमांकाची जर्सी घातलेल्या सुराजकुमारने सामन्यात ३ गोल करत संघाचा पाया भक्कम केला. तसेच आज्ञापाल, शिवम राणा आणि राहुल याने मैदानी गोल करत सामना एकतर्फी ठरवला. पतियाळा संघाचा खेळ डोळ्याचे पारणे फेडणारा असा होता.

Share