मुख्य बातम्या:

यादव चौकात चाकुने वार करुन इसमाल केले जखमी

गोंदिया,दि.10ः- गोंदिया शहर पोलीस ठाणेपरिसरात येत असलेल्या यादव चौकातील पाणी टाकीच्या परिसरात दुपारच्या सुमारास शुल्लक भांडणावरुन दिलीप कोसरे नामक युवकाने यादव चौक निवासी दशरथ कुर्वे(वय 45) याच्या हातापायासह पोटावर चाकुने हल्ला केल्याची घटना घडली.कुर्वे याला जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरिक्षक मनोहर दाभाडे करीत आहेत.आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Share