शेतीमध्ये ‘फ्लाय अँश’ वापराबाबत शेतकरी मेळावा

0
26

तिरोडा,दि.10ः-अदानी पावर महाराष्ट्र लि. तिरोडा येथे पर्यावरण विभाग व अदानी फाऊंडेशनच्यावतीने शेतकर्‍यांकरीता शेतीमध्ये ‘फ्लाय अँश’ वापराबाबत जाणीव जागृती आणि सेंद्रीय खते व किडनियंत्रके प्रदर्शनीचे आयोजन ४ जानेवारी रोजी करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अदानी पावर प्रमुख सी. पी. साहू तर उद्घाटकीय भाषणात मंगेश वावधने यांनी शेतीमध्ये ‘फ्लाय अँश’ वापर जाणीव जागृती शेतकरी मेळावा आणि सेंद्रीय खते व किडनियंत्रके प्रदर्शन हा कार्यक्रम स्तुत्य असून पारंपारिक शेतीला फाटा देत असे नवीन प्रयोग शेतीमध्ये केल्यानेच शेतीच्या उत्पन्नात वाढ होते व त्यामुळे शेती मधून आर्थिक नफा सुद्धा अधिक प्रमाणात मिळू शकते असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात सी. पी. साहू यांनी शेतीमध्ये ‘फ्लाय अँश’ वापराने नक्कीच उत्पन्नात वाढ होते असे शेतकर्‍यांनी गोवंश आधारित म्हणजेच सेंद्रीय शेती करावी, असा मोलाचा सल्ला दिला. तर अदानी फाऊंडेशनचे नितीन शिराळकर यांनी सेंद्रीय शेती करण्याकरीता गांडूळ खत, सेंद्रीय किडनियंत्रके जसे की, दर्शपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रम्हास्त्र व अग्नी अस्त्र याचा वापर करावा व ते कशा पद्धतीने तयार केले जातात याबद्दल शेकर्‍यांना माहिती सांगितली. प्रास्ताविकातून पर्यावरण विभाग प्रमुख ए. पी. सिंग यांनी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी शेतीमध्ये फ्लाय अँशचा वापर करावा असे सांगताना त्याचे फायदे शेतकर्‍यांना पटवून दिले.
प्रदर्शनामध्ये शेतकर्‍यांनी तयार केलेल्या किडनियंत्रके व सेंद्रीय खते तसेच मशरूम विक्रीस ठेवण्यात आले होते. तसेच अदानी फाउंडेशन द्वारा राबविण्यात येणार्‍या ‘कामधेनू’ प्रकल्पांतर्गत कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास आलेल्या नवजात गिर, साहीवाल, थारपारकर आणि मुर्रा जातीच्या वासरांना बघून शेतकर्‍यांना गोपालनाची प्रेरणा मिळाली. संचालन ए. पी. सिंग यांनी केले . तर आभार कैलाश रेवतकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यावरण विभागाचे सर्व कर्मचारी व अदानी फाऊंडेशनचे सर्व कर्मचार्‍यांनी पर्शिम घेतले. शेतकरी मेळाव्याला तालुक्यातील २५0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती होती.