ना. बडोले यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाचे उद््घाटन

0
14

गोंदिया ,दि.10ः-‘शोध क्षमतेचा ग्रामीण ऊर्जे’चा अंतर्गत सामाजीक न्याय विभाग गोंदिया येथील स्पर्धा परिक्षा ग्रंथालयाचे उद््घाटन ना. राजकुमार बडोले मंत्री सामाजीक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री गोंदिया यांचे शुभहस्ते गोंदिया येथे संप्पन्न झाले. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी करावी लागणारी मेहनत तसेच जिवनात काहीतरी मिळवायचे यासाठी लागणारी जि.द्द या बाबत मौलीक मार्गदर्शन केले. सामाजिक न्याय विभाग बार्टी मार्फत ना. राजकुमार बडोले यांच्या संकल्पनातून २00 विद्यार्थ्यांना दिल्ली येथील प्रख्यात वाजीराम, साईराम व इतर संस्थेमध्ये कअर प्रशीक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये ४३ विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी निवड झाली आहे. ही सर्व सामान्य घरातीलच मुले आहेत.
या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन व अभ्यासाकरीता सोयी उपलब्ध करून दिल्यास. ते स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच यशस्वी होतील असे ना. बडोले म्हणाले. गोंदिया येथे बार्टीचे कायम प्रशीक्षण केंद्र लवकरच गोंदिया येथे सुरू करण्याचे ना. बडोले यांनी जाहीर केले. कार्यक्रमास जि. प. अध्यक्ष सिमाताई मढावी, जिल्हाधीकारी कांदबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानीधी, जि.प.समाजकल्याण सभापती विश्‍वजीत डोंगरे, समाज कल्याण विशेष उपायुक्त धारगावे, उपायुक्त मंगेश वानखेडे., जिल्हा ग्रंथालय अधिकारी ढोणे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थीत होते.