मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

जालंधरचे तीन संघ विजयी, मुंबई रेल्वेला यश 

क्वार्टर फायनल सामन्यांना आजपासून सुरुवात
नांदेड,दि.10ःःयेथे सुरु असलेल्या ४६ व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टोर्नामेंट मध्ये गुरुवारी खेळण्यात आलेल्या चार सामन्यात जालंधरच्या तीन संघानी विजय मिळवला. तर वेस्टर्न रेल्वे मुंबई संघाने यश मिळवत उपउपांत्य फेरी गाठली आहे. शुक्रवार (दि. ११) रोजी उपउपांत्य सामन्यांना सुरुवात होत आहे.
आज झालेल्या पहिल्या सामन्यात बी.एस.एफ. जालंधर आणि एच.पी.एस.जी. पंचकुला हरियाणा दरम्यान संघर्षपूर्ण खेळ झाला. कोणत्याही संघाला गोल करता आल्या नसल्यामुळे टायब्रेकर द्वारे निर्णय काढण्यात आले. ज्यामुळे बी.एस.एफ. जालंधर ने ३ विरुद्ध २ अश्या गोल फरकाने सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात वेस्टर्न रेल्वे मुंबई संघाने एकतर्फा खेळ ठरवत ए.सी. गार्ड हैदराबाद संघाला धूर चारली. मुंबई तर्फे शेख अब्दूलने दोन गोल केले. तर अमीर बिन अहमद आणि जी. राघवेंद्र ने एक-एक गोल केला.
तिसर्या सामन्यात सिंगल कॉर्प जालंधर संघाने एन.आय.एस.  पतियाळा संघाला २ विरुद्ध ० गोल फरकाने हरवून उपउपांत्य फेरीत मजल मारली. राहुलसिंग आणि रामनदीप सिंगने एक-एक गोल केला. शेवटचा सामना ई.एम.ई. जालंधर विरुद्ध इलेव्हन स्टार अमरावती यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघानी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एकमेकांवर दोन-दोन गोल साधले. सामना बरोबरीत राहिल्यामुळे टायब्रेकरने निर्णय काढण्यात आले. यावेळी अनुभवी जालंधर संघाने ५ विरुद्ध ३ असा सामना जिंकत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. यावेळी पंच म्हणून सादिक शेख, नितीन शहा, रमेश उट्टेकर, अरुण सिंग, विजय पांचाळ यांनी काम पहिले.
——–
उपांत्यपूर्व फेरीत उद्या आठ संघात सामना होणार आहे. क्वार्टर फायनल फेरीत पोचणाऱ्या संघात ई.एम.ई. जालंधर, सिंगल कॉर्प जालंधर, वेस्टर्न रेल्वे मुंबई, ए.सी. जी. बंगळूर, डोगरा रेजिमेंट फैजाबाद,  एच.पी.एस.जी. पंचकुला हरियाणा, आयन क्लब औरंगाबाद आणि खालसा युथ क्लब नांदेड संघांचा समावेश आहे. शुक्रवारी होणारे सर्व सामने महत्वपूर्ण असून हॉकी प्रेक्षकांनी सकाळी १० वाजता पासून उपस्थित राहून खेळाचे आनंद घ्यावे असे आवाहन खेळ आयोजन समितीचे अध्यक्ष गुरमितसिंघ नवाब, जितेंद्रसिंघ खैरा, महेंद्रसिंग लांगरी, हरविंदर सिंग कपूर, हरप्रीतसिंघ लांगरी, प्रा. जुझारसिंग , खेमसिंग आदींनी केले आहे.

Share