मुख्य बातम्या:

आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर कालवश

वर्धा,दि.10 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (दि. 10) दुपारी अडीच वाजता वरुड (जि. अमरावती) येथे निधन झाले. राष्ट्रसंतांनंतर तुकारामदादा गीताचार्य आणि रामकृष्णदादा बेलुरकर यांनी त्यांचा वारसा पुढे नेला. रामकृष्णदादा यांच्या निधनाने राष्ट्रसंतांच्या सान्निध्यात घडलेला अंतिम दुवा निखळला आहे.
रामकृष्णदादा यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 11) दुपारी 12 वाजता तळेगाव (श्‍यामजीपंत) ता. आष्टी, जि. वर्धा येथील मानव विकास ज्ञानसाधनाश्रम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज त्यांचे पार्थिव श्रीक्षेत्र वरखेड (जि. अमरावती) या मूळ गावी नेण्यात आले.

Share