निवडणुका आल्यामुळेच राममंदिराची आठवण : पृथ्वीराज चव्हाण

0
18

नागपूर, दि.10:: तीन राज्यांत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची अस्वस्थता वाढली आहे. १९९२ नंतर राममंदिराच्या राजकारणाने जोर पकडला. १९९६ मध्ये आम्हाला त्याचा फटकादेखील बसला. मात्र वारंवार एकच मुद्दा समोर करून यश मिळविता येत नाही. जनतेला सत्य माहीत झाले आहे. निवडणुका आल्यामुळेच भाजपाने आपल्या चुका लपविण्यासाठी राममंदिराचा मुद्दा समोर केला आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला नागपुरातील दीक्षाभूमी येथून सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर गणेश टेकडी व ताजबाग येथेदेखील दर्शन घेण्यात आले. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, नसीम खान, अनिस अहमद, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा , नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार मुझफ्फर हुसैन, आशिष देशमुख, अनंत घारड, प्रदेश मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे, प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस रामकिशन ओझा, डॉ.बबन तायवाडे, अमोल देशमुख, प्रा.प्रकाश सोनावणे, श्याम उमाळकर, सचिव तौफिक मुल्लाणी, शाह आलम शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.